(कॉमनला १५ जाहिरातींचे पॅकेज आहे..कृपया आवश्यक..)
धनश्री, स्वस्तिकाची जागतिक एआय परिषदेसाठी निवड
परिषदेत संशोधन सादर करणार, संजीवनीची ‘रूरल टू ग्लोबल’ वाटचाल
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २ : संजीवनी विद्यापीठाच्या धनश्री सुनील देवकर व स्वस्तिका कुलदीप जगताप या दोन विद्यार्थिनी ऑक्सफर्ड विद्यापीठातील जागतिक एआय परिषदेत आपले संशोधन सादर करणार आहेत. जगभरातील केवळ १६ संशोधकांना ही संधी मिळाली. त्यात या सर्वांत कमी वय असलेल्या दोघींचा समावेश आहे. यानिमित्ताने, संजीवनी विद्यापीठाची ‘रूरल टू ग्लोबल’ वाटचाल पुन्हा अधोरेखित झाली, अशी प्रतिक्रिया संजीवनी विद्यापीठाचे अध्यक्ष अमित कोल्हे यांनी व्यक्त केली.
संजीवनी विद्यापीठात शिकणाऱ्या या विद्यार्थिनींच्या ‘क्लॉड एआय लिटरसी’ या रिसर्च पेपरची युनायटेड किंग्डममधील ऑक्सफर्ड विद्यापीठात झालेल्या ‘ग्लोबल एआय समीट- २०२६’ या प्रतिष्ठित जागतिक परिषदेसाठी निवड झाली. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील संशोधन व कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी संजीवनी विद्यापीठाने ऑक्सफर्ड विद्यापीठातील तज्ज्ञांनी स्थापन केलेल्या ‘एर्डोस रिसर्च’ या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. या संस्थेचे संस्थापक व ऑक्सफर्ड विद्यापीठातील एआय तज्ज्ञ प्रा. अजित जावकर यांच्या मार्गदर्शनाखाली धनश्री देवकर व स्वस्तिका जगताप यांनी हा संशोधन पेपर तयार केला.
धनश्री व स्वस्तिका यांनी ‘क्लॉड एआय लिटरसी’ या संशोधन पेपरमध्ये शिक्षक-विद्यार्थी संबंधित अध्यापन व अध्ययनाविषयी संशोधन मांडले आहे. त्यांनी ते संजीवनी इंटरनॅशनल स्कूल (शिर्डी) व संजीवनी ॲकॅडमी (कोपरगाव) येथे प्रत्यक्ष प्रयोगातून सिद्ध केले. दोन्ही ठिकाणी शिक्षकांनी प्रथम एक धडा शिकविला आणि नंतर या दोघींनी ‘क्लॉड एआय लिटरसी’मधील त्यांच्या पद्धतीनुसार शिकविला. चाचणीनंतर ‘क्लॉड एआय लिटरसी’नुसार शिकविलेल्या पद्धतीत विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळाले. यावरून एआयच्य मदतीने शिकविणे अधिक कार्यक्षम आहे. हे या दोघींनी सिद्ध केले आहे. विद्यापीठासाठी हा अभिमानास्पद क्षण असल्याचे अध्यक्ष अमित कोल्हे यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी या दोघींचे अभिनंदन केले. विद्यापीठाचे अध्यक्ष अमित कोल्हे यांनी दोन मुली, त्यांचे पालक सुनील देवकर, श्रद्धा देवकर, कुलदीप जगताप, अश्विनी जगताप यांचा सत्कार केला. कुलगुरू डाॅ. ए. जी. ठाकूर,अधिष्ठाता डॉ. कविथा राणी, डाॅ. सरिता पवार, डाॅ. देवयानी भामरे उपस्थित होत्या.
कोट
ग्रामीण भागातील आमच्या मुलीला संजीवनी विद्यापीठाच्या जागतिक दर्जाच्या शिक्षण पद्धतीमुळे ऑक्सफर्ड विद्यापीठात संशोधन सादर करण्याची संधी मिळाली. ही केवळ आमच्या कुटुंबासाठी अभिमानाची बाब नसून ‘संजीवनी’च्या आधुनिक तंत्रज्ञानाधारित अध्यापन आणि विद्यार्थिकेंद्रित दृष्टिकोनाची साक्ष आहे.
- सुनील देवकर, पालक
आम्ही संवत्सरसारख्या ग्रामीण भागात राहतो. आमच्या मुलीच्या रिसर्च पेपरची ऑक्सफर्ड विद्यापीठाने निवड केली. संजीवनी विद्यापीठामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक व्यासपीठावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली.
-अश्विनी जगताप, पालक
YEO26B26549
कोपरगाव : ऑक्सफर्ड विद्यापीठातील जागतिक एआय परिषदेसाठी निवड झालेल्या धनश्री देवकर व स्वस्तिका जगताप या विद्यार्थिनींनी व पालकांचा सत्कार करताना संजीवनी विद्यापीठाचे अध्यक्ष अमित कोल्हे व पदाधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.