पान-१ ॲंकर
-------------
हिंदी परीक्षा सक्तीचा आदेश शासनाकडून रद्द
---------------
डॉ. कुळकर्णीची माहिती ः संस्कृतसह इतर विषय असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा
------------
सकाळ वृत्तसेवा
येवला,दि. २ : शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत (दहावीला) संस्कृतसह कन्नड,तेलगू,गुजराथी हिंदी आदी विषय घेऊन विषय घेऊन शासकीय नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी शासनाने दिलासादायक एक निर्णय घेतला आहे.सरकारी नोकरी लागताच दहावीचा हिंदीचा अतिरिक्त पेपर देण्याची सक्ती करणारा अनेक दशकांहून जुना जाचक नियम शासनाने अधिकृतपणे रद्द केला आहे.
येथील ज्येष्ठ संस्कृत शिक्षक डॉ. प्रसादशास्त्री कुळकर्णी यांनी यासंदर्भात वेळोवेळी मागणी तसेच विविध संस्कृतप्रेमी संघटनांच्या आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे. शासनाच्या या सकारात्मक निर्णयामुळे हजारो शासकीय कर्मचारांवरील मोठा मानसिक व अभ्यासकीय ताण दूर झाला आहे.
पूर्वीच्या नियमांनुसार, ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत मुख्य किंवा द्वितीय भाषा म्हणून संस्कृत व इतर विषय निवडले होते, त्यांना शासकीय नोकरी मिळाल्यानंतर भाषा संचालनालयामार्फत घेण्यात येणारी हिंदी भाषा परीक्षा स्वतंत्रपणे उत्तीर्ण करणे अनिवार्य होते.
या नियमामुळे नोकरी लागल्यानंतर चाळीशीत किंवा पन्नाशीत असताना पुन्हा शालेय पातळीवरील हिंदीचा अभ्यास करणे, बोर्डाच्या परीक्षा देणे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत जिकिरीचे व ताणतणावाचे ठरत होते. पदोन्नती व सेवाविषयक बाबींवर नकारात्मक परिणाम होत असे.
१६-१ चौकट
सर्व जुने आदेशही अखेर रद्द
डॉ. कुळकर्णी यांनी याविरुद्ध सातत्याने आवाज उठवला. त्यांनी शासनाकडे सतत पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू ठेवला. हिंदी भाषा परीक्षेचा हा आदेश तात्काळ रद्द करावा, यासाठी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच शिक्षणमंत्र्यांकडे निवेदने पाठवली होती. शासनाच्या मराठी भाषा विभागाने अखेर ही सक्ती मागे घेतली आहे. शासनाने १९७६ ते १९९२ या कालावधीत वेळोवेळी निर्गमित केलेले हिंदी परीक्षांसंदर्भातील सर्व जुने शासन निर्णय, परिपत्रके आणि आदेश अधिक्रमित (रद्द) करत असल्याचे घोषित केले आहे.
-----------
कोट
संस्कृत व अन्य विषय घेऊन शासकीय नोकरी मिळालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा हिंदी भाषेची परीक्षा देणे जिकरीचे बनत होते. शासनाने आता हिंदी सक्ती रद्दचा निर्णय घेतल्याने मोठा अडसर दूर झाला असून, या निर्णयाचे राज्यभरातून तीव्र स्वागत होत आहे.
- डॉ. प्रसादशास्त्री कुळकर्णी, संस्कृत अभ्यास मंडळ सदस्य.
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.