नाशिक

पौष्टिक व नाविन्यपूर्ण आहारातून दिला आयुर्वेदिक खाण्याचा सल्ला

CD
YEO26B26566 धानोरे : आयुर्वेदिक विना अग्नी पाककला उपक्रमात विद्यार्थ्यांनी मांडलेले स्टॉल. ----------------- पौष्टिक आहारातून आयुर्वेदिक भोजनाचा सल्ला राष्ट्रीय पोषण सप्ताहानिमित्त मातोश्री आयुर्वेदामध्ये विना अग्नी पाककला उपक्रम --------------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता.४ : चविष्ट अन्न म्हणजे केवळ जिभेचे समाधान नव्हे, तर ते शरीरासाठी पौष्टिक आणि आरोग्यदायी असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ताज्या, नैसर्गिक व संतुलित घटकांचा आहारात समावेश करण्याचा तसेच आयुर्वेदिक पद्धतीने आरोग्यदायी खाण्याचा संदेश देत धानोरे येथील मातोश्री आयुर्वेद महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण सप्ताहानिमित्त विना अग्नी पाककला स्टॉल्स हा नावीन्यपूर्ण उपक्रम उत्साहात पार पडला. महाविद्यालयाच्या स्वस्थवृत्त व योग विभागातर्फे आयोजित या उपक्रमातून संतुलित व पौष्टिक आहार, अन्नस्वच्छता, अन्नसुरक्षा तसेच स्थानिक व नैसर्गिक खाद्यपदार्थांच्या वापराबाबत जनजागृती करण्यात आली. ‘चविष्ट, पौष्टिक आणि आरोग्यदायी आहारासाठी अग्नीची आवश्यकता नाही’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी विविध पदार्थ तयार करून सादर केले. संस्थेचे संचालक सिद्धांत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. प्राचार्य डॉ. ज्योती बडवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करत आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन डॉ. बडवे यांनी केले. उपक्रमात विद्यार्थ्यांनी दहा पेक्षा अधिक आकर्षक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारले. आयुर्वेदिक भेल, थाई पेरू सॅलड, पोमो कप्स, डोल्से रोजा फ्रॅगोला यांसह विविध पदार्थांमध्ये ताजी फळे, भाज्या, कडधान्ये व नैसर्गिक पौष्टिक घटकांचा वापर करण्यात आला. प्रत्येक स्टॉलवर पदार्थांचे नाव, घटक व पोषणमुल्यांची माहिती देण्यात आली. स्वस्थवृत्त व योग विभागाच्या प्रा. डॉ. सीमरन कानकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पाककृती तयार करून त्यांचे आकर्षक सादरीकरण केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पोषणशास्त्रासोबतच अन्नस्वच्छता, अन्नसुरक्षा, नियोजन, टीमवर्क, सर्जनशीलता व संवादकौशल्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. पौष्टिक आहार, निरोगी जीवन आणि स्वच्छ पर्यावरण या त्रिसूत्रीचा जागर करण्यात विना अग्नी पाककला उपक्रम यशस्वी ठरला. -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission ला 10 महिने पूर्ण, सॅलरी-पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर काय झालं? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

IND vs AFG : जसप्रीत बुमराह 'फिट' न झाल्यास, कोण घेईल त्याची जागा? ३ जबरदस्त गोलंदाज शर्यतीत, एक तर जस्सी नसतानाच चमकतो...

MPSC पेपरफुटी प्रकरणात नरहरी झिरवाळांचे स्वीय सहाय्यक गणेश देवरे यांचा खुलासा; म्हणाले, ‘मी दोषी आढळल्यास...’

Horoscope: ८ नोव्हेंबरआधी चमकणार भाग्य! पुढील ६४ दिवस 'या' राशींसाठी आहेत खास; नोकरीत प्रमोशन अन् व्यवसायात मोठा नफा...

Marathi News Live Updates: "लाडका भाऊ लवकरच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार", पुण्यात झळकले एकनाथ शिंदेंचे फ्लेक्स

SCROLL FOR NEXT