३६-३
परीक्षा न देता व्हा गावातच पोस्टमन!
---
टपाल खात्यात अडीच हजार जागा; नाशिक-मालेगाव विभागात ९२ पदांवर नोकरीची संधी
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. ६ : नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी उत्तीर्ण युवक-युवतींसाठी टपाल खात्याने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. ग्रामीण टपाल विभागात शाखा पोस्टमास्तर (बीपीएम) आणि सहायक शाखा पोस्टमास्तर (एबीपीएम) या पदांसाठी मालेगाव सर्कलमध्ये ५७ व नाशिक सर्कलमध्ये ३५ जागा भरल्या जातील. विशेष म्हणजे या भरतीसाठी लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नसून, दहावीच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादीतून उमेदवारांची निवड होणार असल्याने गावातच पोस्टमन होण्याची संधी युवकांना चालून आली आहे.
.............
ही भरती केवळ दहावीच्या गुणांवर आधारित संगणकीकृत गुणवत्ता यादीद्वारे होणार आहे. त्यामुळे लेखी परीक्षा, मुलाखत किंवा स्वतंत्र स्पर्धा परीक्षेची गरज नाही. दहावीच्या गुणांच्या आधारे तयार होणाऱ्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या उमेदवारांची पुढील प्रक्रियेसाठी निवड होणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी टपाल खात्याच्या अधिकृत अधिसूचनेचा काळजीपूर्वक अभ्यास करावा. पदनिहाय पात्रता, विभागनिहाय रिक्त जागा, अर्ज शुल्क, आवश्यक कागदपत्रे तसेच अर्जाची अंतिम तारीख याबाबतची माहिती अधिकृत संकेतस्थळावर तपासूनच अर्ज करणे आवश्यक आहे. इच्छुकांनी आपले अर्ज टपाल खात्याच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन मुदतीपूर्वी भरावे.
......................
चौकट
अशी असेल भरती
- ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख : १९ सप्टेंबर
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : २१ सप्टेंबर
- अर्ज दुरुस्ती : २३ ते २४ सप्टेंबर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.