YEO26B26616
भाटगाव : विश्वलता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील बँक अधिकारी पदावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत संचालक भूषण लाघवे तसेच पदाधिकारी, प्राध्यापक.
---------
‘विश्वलता’च्या ४५ विद्यार्थ्यांची स्मॉल बँकेमध्ये निवड
---------
रोजगाराभिमुख उपक्रमाला यश; विद्यार्थ्यांच्या करिअरला मिळाली नवी दिशा
---------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.८ : भाटगाव येथील विश्वलता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि करिअर-पिलर लर्निंग सोल्युशन्स प्रा. लि. यांच्यातर्फे कॅम्पस मुलाखतीत ४५ विद्यार्थ्यांची बँक अधिकारी पदावर निवड झाली आहे. एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या थेट मुलाखत व निवड प्रक्रियेतून विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा मिळाली.
महाविद्यालयात झालेल्या या निवड प्रक्रियेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाशिक, पुणे व अहिल्यानगर येथे उपलब्ध असलेल्या पदांसाठी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक ३ लाख ५० हजार रुपयांचे वेतन पॅकेज मिळणार असून, प्रशिक्षणासह बँकिंग क्षेत्रात उज्ज्वल करिअर करण्याची संधी मिळणार आहे.
संचालक भूषण लाघवे यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळविणे पुरेसे नाही; विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानासोबत संवादकौशल्य, आत्मविश्वास, तांत्रिक कौशल्ये आणि कार्यक्षमता विकसित करणे गरजेचे आहे. रोजगाराच्या संधी शोधण्यापेक्षा त्या संधींसाठी स्वतःला सक्षम बनविणे अधिक महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले. प्राचार्य ज्ञानदेव कदम यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचे रूपांतर यशस्वी कारकिर्दीत करावे असे आवाहन केले.
प्रास्ताविक प्रा. अक्षय बळे यांनी केले. विद्यार्थिनी कल्याणी सोनवणे हिने सूत्रसंचालन केले. प्रा. अमोल मोरे यांनी आभार मानले. यशस्वी आयोजनासाठी प्रा. अमोल मोरे, प्रा.गिताश्री शिंदे,वैभवी डुकरे, ऋतुजा गळिंबे, श्रद्धा अस्वले, हृषेता सोनवणे व आश्विनी जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयाच्या रोजगाराभिमुख उपक्रमाला मिळालेले हे यश विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले असून, ४५ विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.