मेन
-----------
YEO26B26621
येवला : आरक्षणासह विविध मागण्यांप्रश्नी तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देताना धनगर समाज बांधवांची पदाधिकारी व कार्यकर्ते.
--------------
धनगर समाजाचा येवल्यात जनआक्रोश
-----------
मोर्चाद्वारे आमदार पडळकराच्या आंदोलनाला पाठिंबा, तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन
--------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.७ : धनगर समाजाला महाराष्ट्रात एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी शासनाने लक्ष घालावे, संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करावा तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सिंगरोबा धनगर यांच्या स्मृतीला सन्मान मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी येथे सकल धनगर समाजातर्फे सोमवारी येथे जनआक्रोश मोर्चा काढून घोषणाबाजी करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
---------------
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचा येथील धनगर समाज बांधवांनी पाठिंबा व्यक्त केला. जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन सादर केले. प्रारंभी विंचूर चौफुली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर विविध मागण्यांच्या घोषणा देत आंदोलक तहसील कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. येळकोट येळकोट जय मल्हार, संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलकांनी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. धनगर आरक्षणाची अंमलबजावणीसाठी शासनाने सर्वोच्च न्यायालयातील लढाई पूर्ण ताकदीने लढावी आणि निर्णय प्रतिकूल झाल्यास आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने ठोस प्लँन बी तयार ठेवावा, श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी देवस्थानासाठी विशेष शासकीय कायदा करावा. २१ विश्वस्तांपैकी किमान १ विश्वस्त मेंढपाळ समाजातील असावेत आणि अध्यक्षही मेंढपाळ समाजातील असावा, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील नवीन कनेक्टिंग लोणावळा मिसिंग लिंकला हुतात्मा वीर सिंगरोबा धनगर यांचे नाव द्यावे, मुंबईतील चर्चगेटला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे आदी मागण्या प्रामुख्याने करण्यात आल्या.
----------------
२०-२ चौकट
२०१४ पासून धनगरांना केवळ आश्वासन
२०१४ मध्ये दिलेला शब्द पाळा असा स्पष्ट इशारा देत आंदोलकांनी शासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.२०१४ च्या निवडणुकीत धनगर समाजाने एकजुटीने तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी उभे राहून सरकारला पूर्ण बहुमत मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी धनगर समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अनेक वर्षे उलटूनही प्रमुख मागण्या प्रलंबित असल्याने समाजात नाराजी आहे, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनेत्रा पवार यांनी धनगर समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी समाजाचे नेते डॉ. सुधीर जाधव, दत्तात्रेय वैद्य, बबनराव साळवे, दत्तात्रेय देवरे आदींनी बोलताना व्यक्त केली. मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
---------------
आंदोलनात बबनराव साळवे, दत्तात्रेय वैद्य, गणपत कांदळकर, डॉ. सुधीर जाधव, दत्तू देवरे, श्रावणबाबा वाघमोडे, गणेश गायकवाड, दीपक शेंद्रे, किरण बडे, सागर सोनवणे, शिवाजी जाधव, संजय गोराने, विजय काळे, महेश बिडगर, विजय ठोंबरे, भीमराज खांडेकर, पुंडलिकराव खांडेकर, सोमनाथ आगवन, कारभारी आगवन, चंद्रकांत जाधव, समाधान वाघमोडे, सूर्यभान होंडे, भाऊसाहेब होंडे, ऋषिकेश फासाटे, बाळू वाघमोडे, मच्छिंद्र रोकडे, संदीप आगवन, विजय वैद्य आदी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होते.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.