YEO26B26660
येवला : येथील आढावा बैठकीत बोलताना आमदार पंकज भुजबळ. समवेत अधिकारी व पदाधिकारी.
-------------
३६-३
वीजप्रश्न मार्गी लावा, दुष्काळाचे नियोजन करा
आमदार भुजबळ : संपर्क कार्यालयात जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१० : मतदारसंघातील वीजपुरवठ्याशी संबंधित सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावावेत. एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत कुणीही पाण्यावाचून वंचित राहणार नाही, यासाठी पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्यात यावे अशा सूचना आमदार पंकज भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
आमदार भुजबळ यांच्या उपस्थितीत संपर्क कार्यालयात विविध विकासकामांबाबत आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, मोहन शेलार, साहेबराव आहेर, जावेद लखपती, मकरंद सोनवणे, भाऊसाहेब धनवटे, नवनाथ थोरात, महेश गादेकर आदी उपस्थित होते.
विविध गावांमध्ये भेडसावत असलेल्या वीजपुरवठ्याच्या समस्या, कृषी पंपांसाठी वीज उपलब्धता, वीजपुरवठ्यातील अडथळे तसेच पाणीटंचाईची परिस्थिती याबाबत चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांना वीज आणि पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी यंत्रणांनी संवेदनशीलतेने काम करण्याच्या सूचना भुजबळ यांनी दिल्या.
उपलब्ध पाणीसाठ्याचा काटेकोर व नियोजनबद्ध वापर करण्याबरोबरच पिण्याचे पाणी, शेतीसाठी उपलब्ध पाणी तसेच भविष्यातील पाणीटंचाईचा संभाव्य धोका लक्षात घेऊन नियोजन करण्यात यावे. पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी आवश्यक त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्यावर भर द्यावा असे त्यांनी निर्देशित केले. विकासकामांचा आढावाही घेण्यात आला. निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, याबाबतही आमदार भुजबळ यांनी सूचना केल्या.
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.