नाशिक

एसएनडी अभियांत्रिकीचा ऑस्ट्रेलियातील संस्थेसोबत ऐतिहासिक सामंजस्य करार बाभूळगाव : शैक्षणिक देवाणघेवाण, संशोधन व विद्यार्थ्यांना जागतिक तंत्रज्ञानाचा अनुभव

CD
कृपया आवश्यक फोटो- 26688 बाभूळगाव : एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालय व ऑस्ट्रेलियातील स्टडी ऑफ ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजीज ॲन्ड हेल्थकेअर यांच्यातील सामंजस्य करारप्रसंगी हॅरी साठे, समाधान झाल्टे, प्राचार्य डॉ. दीपक पाटील आदी. ‘एसएनडी’चा ऑस्ट्रेलियात सामंजस्य करार बाभूळगाव : शैक्षणिक देवाणघेवाण, संशोधन व विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा अनुभव सकाळ वृत्तसेवा येवला, ता. १२ : जगदंबा शिक्षण संस्थेच्या बाभूळगाव येथील एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयाने शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल टाकत ऑस्ट्रेलियातील स्टडी ऑफ ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजीज ॲन्ड हेल्थकेअर एज्युकेशन प्रा. लि. या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. यामुळे शैक्षणिक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन, विद्यार्थी-प्राध्यापक विनिमय तसेच प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. या करारामुळे एसएनडी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण संशोधन, परदेशी तंत्रज्ञानाचा अनुभव तसेच उद्योग-केंद्रित प्रशिक्षणाच्या संधी मिळणार आहेत. महाविद्यालयाचे संचालक डॉ. दीपक पाटील, सहसंचालक डॉ. डी. पी. क्षीरसागर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे, डॉ. रोहित पोटे व विभागप्रमुख उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय सहकार्यांतून महाविद्यालयाचा दर्जा अधिक उंचावेल आणि विद्यार्थ्यांना बहुसांस्कृतिक शैक्षणिक अनुभव मिळेल, असे प्राचार्य डॉ. दीपक पाटील यांनी सांगितले. ............... कोट या करारामुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची संधी मिळेल तसेच त्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणाची व संशोधनाची दालने खुली होतील. तसेच एसएनडी महाविद्यालयही एक अग्रगण्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रशिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाईल. - रूपेश दराडे, कार्यकारी संचालक, जगदंबा शिक्षण संस्था, येवला .................

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : डल्लुपुरा येथील धर्मशिला हॉस्पिटलजवळील गोदामाला आग

SCROLL FOR NEXT