नाशिक

तुरेदार फेटा,पैठणी शेला अन् डायमंड वर्कने बाप्पांचे रूप खुलले..! येवल्यात मूर्ती खरेदीसह मंडळे,घरगुती नियोजन पूर्ण,रविवारच्या सुट्टीमुळे बाजारपेठेत गर्दी

CD
पान-४ मेन फोटो- 26696, 26698 येवला : पितांबर व फेटा घातलेली गणरायाची आकर्षक मूर्ती. दुसऱ्या छायाचित्रात मूर्ती खरेदी करताना नागरिक. तुरेदार फेटा अन् पैठणी शेलाने गणरायाचे रूप खुलले..! येवल्यात मूर्ती खरेदीसह मंडळांचे नियोजन पूर्ण; सुटीमुळे बाजारपेठेत गर्दी सकाळ वृत्तसेवा येवला, ता. १३ : गणरायाच्या आगमनाने अवघे वातावरण भक्तिमय झाले आहे. यंदा गणरायाच्या राजेशाही थाटानेही भक्तांचे लक्ष वेधले आहे. सिंहासनावर विराजमान गणराय, डोक्यावर दिमाखदार तुरेदार फेटा, अंगावर पैठणीचे वस्त्र आणि त्यावर खुलून दिसणारे डायमंड वर्क अशा मनोहारी रूपातील गणेशमूर्ती सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. पैठणीच्या नाजूक धाग्यांत आणि चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नक्षीतून साकारलेला गणरायाचा शाही साज जणू पारंपरिक मराठमोळ्या संस्कृतीला आधुनिक कलाकुसरीची झळाळी देत आहे. ..................... शहराची ओळख असलेल्या पैठणी कलेची झलक यंदा गणेशमूर्तींच्या सजावटीतही पाहायला मिळत आहे. बाजारपेठेत आकर्षक सजावटीच्या गणेशमूर्तीला पसंती मिळत आहे. आठवड्यापासून शहरात मूर्ती विक्रीसाठी आल्या असून, अनेकांनी बुकिंगही केले आहे. आज रविवारी (ता. १३) उद्याच्या उत्सवाची तयारी जोरदार दिसली. स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या पटांगणात मूर्तीच्या विक्रीचे स्टॉल असले तरी शहरभर विविध दुकानांतही मूर्ती विक्रीला आहेत. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला रविवारी येथील गर्दीमुळे बाजारपेठेला बूस्ट मिळाला. गणेशमूर्ती, पूजेचे साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि नैवेद्यासाठी लागणारे पदार्थ खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. अनेक मंडळांचे मंडप पूर्ण झाले असून, घरगुती उत्सवासाठीही नागरिकांनी मूर्ती खरेदी व बुकिंग सुरू आहे. यंदा सजावटीच्या साहित्यात २० ते २५ टक्क्यांनी वाढ होऊनही भक्तांचा उत्साह कमी झालेला नाही. बाजारात शंकर-पार्वतीच्या मांडीवर बसलेला, शारदेसोबत, नंदी सोबत, लंबोदर, शेष नागावर डुलणारा, दगडूशेट, लालबाग, कृष्णावतार, सिंहासनावर आरुढ, बालगणेश, पंचागकर्ता अशा मूर्तींना पसंती मिळत आहे. येथील मूर्ती थेट गुजरातला जात आहेत. शहर व तालुक्यातील ३०० हून अधिक मंडळे ‘श्रीं’ची स्थापना करणार आहेत. स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या पटांगणासह शनिपटांगण व बाजारपेठेचत आरास साहित्याची दुकाने सजली आहेत. विशेषतः येथे मूर्ती बनविणारे तीन ते चार मोठे कारागीर आहेत. ............. चौकट प्लॅस्टिकच्या आराशीला मागणी या वर्षी प्लॅस्टिकच्या पाइपापासून बनविलेल्या आराशीला मोठी मागणी आहे. अनेक जण ही आरास बनवत आहेत. तसेच काही ठिकाणी तयार आराशीसाठीही ऑर्डर दिल्या जात आहेत. सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ फुलली असून, विजेच्या माळांना सर्वाधिक मागणी आहे. प्लॅस्टिकच्या फुलांच्या माळा, मोत्यांचा हार, थर्माकोल आणि पत्र्यांवर नक्षीकाम केलेले मखर, पाट, चौरंगालाही मागणी आहे. .........

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : डल्लुपुरा येथील धर्मशिला हॉस्पिटलजवळील गोदामाला आग

SCROLL FOR NEXT