नाशिक

एन्झोकेमच्या गणरायाचे वारकरी टाळनृत्य पथक व गरबा पथकाकडून स्वागत

CD
येवला जोड ---------------- सजीव देखाव्याचा चित्ररथ सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन्झोकेम विद्यालयाच्या गणरायाचे ढोलताशाच्या गजरात शहरातून वाजतगाजत मिरवणुकीद्वारे आगमन झाले. मुलींचे झांज पथक, लेझीम पथक, वारकरी टाळनृत्य पथक व गरबा पथक यांनी शहरातील प्रमुख चौकांत नेत्रदीपक कलाविष्कार नृत्ये सादर करून शहरवासियांची मने जिंकून घेतली. विद्यालयाचा सजीव देखावा दर्शविणारा आकर्षक चित्ररथ मिरवणुकीत सहभागी होता. चित्ररथावर श्रेयस पाटील (गणेश), अनंत धनवटे (महादेव), अवंती गाडेकर व आरुषी लकारे (रिद्धी- सिद्धी) हे वेगवेगळ्या वेशभूषेत आरूढ होते. संस्थेचे प्रशासनाधिकारी दत्ता महाले, पर्यवेक्षक विजय क्षीरसागर व इतर अनेक विदयार्थ्यांनी लाठीकाठी फिरविण्याची चित्तथरारक प्रात्यक्षिके मिरवणुकीत सादर केली. विद्यालयाच्या झांज पथकास प्रसेन पटेल व रिझवान शेख यांनी, गरबा नृत्यास स्वाती सानप व रिना पाबळे, शीतल शिंदे, सुरेखा गिरासे, पुष्पा कांबळे, राखी मोकळ व मीना गुजराथी यांनी, लेझीम पथकास रामेश्वरी शिंदे, वैशाली शेलार, पल्लवी मोरे व नलिनी गायकवाड यांनी तर टाळकरी नृत्यास आसावरी जोशी, वीणा पराते व शीतल महाजन यांनी मार्गदर्शन केले. माजी प्राचार्य अनिल शेलार व सौ. वैशाली शेलार यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना झाली. उपप्राचार्य कैलास धनवटे, पर्यवेक्षक विजय क्षीरसागर,उच्च माध्यमिक विभाग प्रमुख किशोर सोनवणे, उत्सवप्रमुख संदीप जेजुरकर,शीतल महाजन आदी उपस्थित होते. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT