पान चार ॲंकर
---------------------
26733
येवला : १३९ वर्षांची परंपरा असलेला शहरातील कै. धोंडीराम वस्ताद तालीम संघाच्या प्रथम मानाच्या गणरायाची मूर्ती.
येवला तालुक्यात १६२ मंडळांकडून श्रींची स्थापना
१९ गावांत सामाजिक सलोख्याचा गणेशोत्सव; सामाजिक उपक्रमांना प्राधान्य
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. १५ : गावागावांतील गट-तट, मतभेद आणि स्पर्धेला फाटा देत सामाजिक एकोपा जपण्याचा संदेश देणाऱ्या ‘एक गाव...एक गणपती’ संकल्पनेला तालुक्यात यंदाही प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील १२३ गावांपैकी १९ गावांनी एकत्रितपणे श्रींची स्थापना केली आहे. दुसरीकडे, गणेशोत्सवाच्या निमित्ताने बालभोजन, कीर्तन, प्रवचन, रक्तदान शिबिरांसह विविध सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गावातील सामाजिक सलोखा, शांतता आणि एकोपा अबाधित राहावा, गट-तटांना उत्सवात स्थान मिळू नये आणि संपूर्ण गावाने एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करावा, या पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत १९ गावांनी ...एक गणपती’ उपक्रम राबविला आहे. ग्रामस्थांचा एकत्रित सहभाग या उपक्रमाचे वैशिष्ट्य़ ठरत आहे.
एकत्रित गणपतीच्या माध्यमातून गावात विविध सामाजिक उपक्रमांना चालना मिळत आहे. दारूबंदी, स्त्रीभ्रूणहत्या, महिला सक्षमीकरण, आरोग्य आदी विषयांवर जनजागृती केली जात आहे. तसेच बालभोजन, कीर्तन, प्रवचन, विविध स्पर्धा आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. अनावश्यक खर्चाला फाटा देत बालभोजनाची प्रथा जपण्याचा प्रयत्नही काही गावांत केला जात आहे.
------
संख्येत निम्म्याने घट
तालुक्यात २०१८ मध्ये तब्बल ७२ गावांनी या संकल्पनेला प्रतिसाद दिला होता. २०१९ मध्ये ही संख्या ९१ वर पोहोचली. २०२५ मध्ये ३५ गावांनी ‘एक गाव... एक गणपती’ उपक्रम राबविला होता. यंदा मात्र ही संख्या १९ वर आली आहे. यामध्ये शहर हद्दीतील ८ आणि तालुका हद्दीतील ११ गावांचा समावेश आहे.
-----
१६२ मंडळांकडून स्थापना
यंदा येवला शहर हद्दीत १८ मोठी आणि ४१ छोटी, तर तालुका पोलिस हद्दीत ६६ लहान आणि १८ मोठी अशा एकूण १६२ गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे. शहर पोलिस ठाणे हद्दीतील ८, तर तालुका पोलिस ठाणे हद्दीतील ११ गावांमध्ये ‘एक गणपती’ची स्थापना करण्यात आली आहे.
----------
पोलिसांचा चोख बंदोबस्त
गणेश मंडळांची संख्या आणि उत्सवाच्या काळात वादावादीच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक, ग्रामीण भागात किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शहरात अनेक मंडळांनी श्री ची स्थापना केली असून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. ग्रामीण भागात पोलिसांच्या पुढाकाराने ‘एक गाव... एक गणपती’ ही संकल्पना गेल्या ८-१० वर्षांपासून चांगलीच मूळ धरत आहे.
- डॉ. भूषण शिनकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.