नाशिक

देखाव्यातून गणरायापुढे मांडली कांदा उत्पादकांची व्यथा!

CD
YEO26B26737 अंदरसूल : येथील भागवत कुटुंबीयांनी साकारलेला कांदा समस्येचा देखावा. ---------------- देखाव्यातून मांडली कांदा उत्पादकांची व्यथा भागवत कुटुंबीयांकडून अनोखी आरास -------------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१५ : कधी भावाच्या आशेने डोळे बाजारभावाच्या फलकाकडे तर कधी पडलेल्या दराने डोळ्यांत पाणी... कांदा पिकवताना बळीराज्याच्या वाट्याला येणारी हीच उपेक्षा गणरायाच्या चरणी मांडण्यात आली आहे. अंदरसूल येथील डॉ. तुषार भागवत व डॉ. शीतल भागवत दांपत्याने कांदा उत्पादकांच्या व्यथांना आपल्या अनोख्या देखाव्यातून बोलके केले आहे. ‘बळीराजाच्या घामाला कष्टाचे मोल आणि शेतीमालाला योग्य भाव मिळू दे,’ अशी साद गणरायाला घातली आहे. कांद्याचे भाव वाढतात तेव्हा शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नसतो आणि उत्पादन मुबलक झाले की भाव गडगडतात... कांदा उत्पादकांच्या या कायमच्या कोंडीतून निर्माण झालेली व्यथा थेट गणरायाच्या चरणी मांडत अंदरसूल येथील भागवत कुटुंबीयांनी यंदाच्या गणेशोत्सवात सामाजिक आशयाचा आगळावेगळा देखावा साकारला आहे. कांद्याच्या दरातील चढ-उतार, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतील अडचणी यामुळे शेतकऱ्यांच्या वाट्याला येणारी आर्थिक कोंडी या देखाव्यात प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या भावना मांडणारा हा देखावा सध्या चर्चेत आहे. ------------- कोट कांद्याचे उत्पादन जास्त झाले, की कांद्याचे भाव पडतात आणि भाव वाढतात तेव्हा शेतकऱ्यांकडे कांदा संपलेला असतो. देखाव्यातून शेतीमालाला योग्य भाव मिळू दे, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना आहे. - डॉ. शीतल भागवत, अंदरसूल ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT