26745
येवला : खरेदी विक्री संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष भास्कर येवले, उपाध्यक्ष ताई बोडके यांचा सत्कार करताना ॲड. माणिकराव शिंदे, संभाजी पवार, कुणाल दराडे.
येवला तालुका खरेदी विक्री संघ
अध्यक्षपदी भास्कर येवले बिनविरोध
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. १६ : तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी माजी आमदार मारोतराव पवार गटाचे भास्कर येवले तर उपाध्यक्षपदी आमदार किशोर दराडे गटाच्या ताई बोडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत संघाच्या कार्यालयात निवड पार पडली.
संघाचे विद्यमान अध्यक्ष मच्छिंद्र थोरात व उपाध्यक्ष सविता देवरे यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने बुधवारी (ता.१६) अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी संघाच्या कार्यालयात विशेष सभा सहकार अधिकारी रवींद्र शेजवळ यांच्या अध्यक्षतेखाली
बोलाविण्यात आली होती. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्यवस्थापक बाबासाहेब जाधव यांनी काम पाहिले.
विशेष सभेपुर्वी मुदतीत माजी आमदार मारोतराव पवार गटाचे संचालक भास्कर येवले तर उपाध्यक्षपदासाठी माजी आमदार नरेंद्र दराडे गटाकडून संचालिका ताई बोडके यांनी मुदतीत उमेदवारी अर्ज दाखल केले. भास्कर येवले यांना सूचक म्हणून संचालक मनोज रंधे तर अनुमोदक म्हणून ऋषिकेश कुऱ्हे यांनी व उपाध्यक्ष पदासाठी ताई बोडके यांना सूचक संचालक सुमित थोरात व अनुमोदक संजय सालमुठे यांच्या सह्या होत्या. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र शेजवळ यांनी श्री. येवले व श्रीमती. बोडके यांची बिनविरोध निवड जाहीर केले.
नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष्याचा ज्येष्ठ नेते ॲड.माणिकराव शिंदे, सहकार नेते अंबादास बनकर, माजी सभापती संभाजी पवार, कुणाल दराडे, बाजार समिती सभापती वसंत पवार यांनी केला. सभेला संचालक मच्छिंद्र थोरात, पि.के काळे, संजय सालमुठे, सुनील देशमुख, सविता देवरे, विजय कोटमे, परसराम गांगुर्डे, प्रताप दाभाडे, ज्ञानेश्वर बोरणारे, ऋषिकेश कुऱ्हे, महेंद्र वैद्य, गंगाधर भागवत, साहेबराव दौंडे, दिलीप मेंगाळ, अशोक झांबरे, रामदास पवार, प्रमोद बोडके, कांतीलाल साळवे, ॲड. बापू गायकवाड, दत्तू देवरे, रवी काळे, बबन साळवे, रामदास महाले, चंद्रकांत शिंदे, कोंडाजी कदम उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.