पान एक सेकंड मेन
------------
गावगाड्याचा कारभार पुन्हा अधिकाऱ्यांच्या हाती
जिल्ह्यात ६१५ ग्रामपंचायतींवर प्रशासक ; ग्रामस्थांसह इच्छुकांना निवडणुकीची प्रतीक्षा
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. १६ : ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासक नियुक्त झाले आहेत. मात्र, यात गावगाड्याचा कारभार पुन्हा अधिकाऱ्यांच्या हाती आल्याने नागरिकांच्या प्रश्नांना खो आहे. प्रशासक नियुक्तीमुळे ग्रामपंचायतींचा कारभार पूर्णपणे ठप्प होणार नसला तरी ही प्रकिया वेळ घेणारी ठरणार आहे. त्यामुळे निवडणुका वेळेत घेऊन पुन्हा लोकनियुक्त ग्रामपंचायती अस्तित्वात आणण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने यापूर्वी सहा महिन्यासाठी प्रशासक नेमणूक झाली होती. त्यांची मुदत संपल्याने आता पुन्हा जिल्ह्यातील तब्बल ६१५ ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासकीय राजवट आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी याबाबत आदेश काढला असून, कृषी, आरोग्य, शिक्षण, ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी व अन्य शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करता येणार आहे. या प्रशासकांचा कार्यकाळ अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिवसापासून जास्तीत जास्त सहा महिने किंवा संबंधित ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन नवी ग्रामपंचायत अस्तित्वात येईपर्यंत, यापैकी जे आधी होईल तेवढाच राहणार आहे.
-
लोकप्रतिनिधींच्या कामकाजाला खीळ
ग्रामपंचायत ही गावाच्या दैनंदिन प्रशासनाची आणि स्थानिक विकासाची महत्त्वाची कडी आहे. सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या माध्यमातून गावातील पाणीपुरवठा, रस्ते, गटारी, पथदिवे, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा, कर वसुली तसेच विविध विकासकामांचा पाठपुरावा केला जातो. मात्र निवडणुका लांबल्याने आता या कामांची जबाबदारी थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आली आहे. लोकप्रतिनिधीच्या अनुपस्थितीत ग्रामस्थांना विविध कामांसाठी ग्रामपंचायत कार्यालय तसेच संबंधित विभागाकडेच पाठपुरावा करावा लागणार आहे.
--------
प्रशासकांच्या अधिकारांनाही मर्यादा
नियुक्त प्रशासकांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, संबंधित नियम, शासन आदेश आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायतीचे कामकाज पाहावे लागणार आहे. त्यामुळे निवडणुका कधी होणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले.
प्रशासक नियुक्त ग्रामपंचायती
तालुका गावांची संख्या
सिन्नर १००
मालेगाव ९९
येवला ६९
निफाड ६४
दिंडोरी ६०
नांदगाव ५९
चांदवड ५३
बागलाण ४०
कळवण २९
नाशिक २५
देवळा ९
इगतपुरी ५
त्र्यंबकेश्वर ३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.