YEO26B26760
येवला : तालुका पोलिसांनी पकडलेला मुद्देमाल मालकास देताना पोलीस अधिकारी.
३०-२
सतरा ग्रॅम सोन्याच्या नेकलेसह
एक लाखांची रोकड हस्तगत
येवला तालुका पोलिसांकडून गुन्ह्यांचा छडा
---------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१७ : घरफोडीतील सतरा ग्रॅम सोन्याच्या नेकलेससह चोरीस गेलेली एक लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे. पोलिस निरीक्षक किरण शिंदे व त्यांच्या पथकाने काही दिवसांत तीन गुन्ह्यांचा छडा लावत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे येवला येथून राजापूरच्या दिशेने विनापरवाना व बेकायदेशीरपणे वाळू घेऊन जाणारा १२ टायर हायवा डंपर (एमएच ४१,बीएक्स ८३३४) नगरसूल जवळील राजापूर क्षेत्रात अडवण्यात आला. तपासणी केली असता कोणतीही रॉयल्टी किंवा अधिकृत परवाना नसल्याचे उघड झाले. पोलिसांनी ४० लाख रुपये किमतीचा हायवा डंपर आणि ५६ हजार रुपयांची ७ ब्रास अवैध वाळू असा एकूण ४० लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
खरवंडी येथील भाऊसाहेब सौदाणे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरांनी कपाटातील दागिने लांबवले होते. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातून ५७ हजार रुपये किमतीचा १७ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस शोधून काढला आणि तो कायदेशीर प्रक्रियेनंतर फिर्यादींना परत केला.
देवठाण येथील वृद्ध गंगाधर भागुजी गायकवाड यांच्या घरातून चोरांनी २ लाखाची रोख रक्कम चोरली होती. गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर संशयिताला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. संबंधिताकडून चोरीस गेलेल्या रकमेपैकी एक लाखांची रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. अवैध वाळू उपसा व तस्करीप्रकरणी तातडीने पोलिसांशी (डायल ११२ किंवा ०२५५९-२६५०७३) संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.