नाशिक

गणेश विसर्जनाचे नियोजन करून सुरक्षित व सुरळीत पार पाडा!

CD
YEO26B26826 अंगणगाव : विसर्जन होणाऱ्या घाटाची पाहणी करताना आमदार पंकज भुजबळ समवेत मुख्याधिकारी तुषार आहेर,बाळासाहेब लोखंडे आदी. -------------- गणेश विसर्जनासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध कराव्यात पंकज भुजबळ : अंगणगाव घाट, बोटक्लबची पाहणी --------------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता.२१ : भाविकांना विसर्जनासाठी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या विविध विभागांनी समन्वयाने काम करावे. विसर्जन सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडण्यासाठी घाट परिसरातील स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, सुरक्षिततेच्या उपाययोजना, गर्दीचे नियोजन तसेच आवश्यक सुविधा करण्यात याव्यात असे निर्देश आमदार पंकज भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंगणगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट तसेच बोटिंग क्लब परिसराची भुजबळ यांनी प्रत्यक्ष पाहणी करून विसर्जन सोहळ्याच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या प्रशासकीय तयारीचा सविस्तर आढावा घेतला. मुख्याधिकारी तुषार आहेर, मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे उपस्थित होते. विसर्जनप्रसंगी महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दिव्यांग भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. अहिल्यादेवी होळकर घाट, बोटिंग क्लब परिसरातील स्वच्छता, सुरक्षितता, प्रकाश व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. प्रशासनाने कोणत्याही प्रकारची हलगर्जी न करता नियोजनबद्ध पद्धतीने काम करून विसर्जन सोहळा शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी पूर्णपणे सज्ज राहावे, असे आमदार पंकज भुजबळ यांनी सांगितले. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS U19: ज्युनियर सेहवाग अर्धशतकापासून हुकला, अन्वय द्रविड्हचीही बॅट शांत; यशवर्धन चौहानने मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकलं शतक

Walchandnagar News : बुलेटच्या सायलेन्सर वरुन फिरविला रोलर....; पोलिसांनी बुलेटचा फट् -फट् आवाज केला बंद...

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

SCROLL FOR NEXT