पान-३ मेन
--------------
अवघ्या बारा प्रशासकांवर ६९ गावांचा भार
येवला ः एकाकडे ११ गावांची जबाबदारी; विकासकामांच्या पाठपुराव्यावर प्रश्नचिन्ह
----------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.२१ : तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्याने त्यांचा कारभार आता अवघ्या १२ प्रशासकांच्या खांद्यावर सोपविण्यात आला आहे. एका प्रशासकाकडे किमान दोन, तर कमाल तब्बल ११ ग्रामपंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय कामकाजासह अनेक ग्रामपंचायतींचा कारभार सांभाळताना गावागावातील समस्या आणि विकासकामांना प्रशासक किती वेळ देऊ शकतील, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपून एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. निवडणुका न झाल्याने सुरवातीला तत्कालिन सरपंचांकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, सहा महिन्यांच्या कालावधीत निवडणूक प्रक्रिया पूर्ण न झाल्याने आता शासकीय अधिकाऱ्यांकडे प्रशासकपदाचा कारभार देण्यात आला आहे. ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत किंवा आदेशातील निर्धारित कालावधीपर्यंत ही व्यवस्था राहणार आहे.
विस्तार अधिकारी भरत मोहिते यांच्याकडे सर्वाधिक ११, प्रशांत दहिफळे आणि चांगदेव मुंढे यांच्याकडे प्रत्येकी १० आणि इतर प्रशासकांकडे दोन ते सहा ग्रामपंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे.
विकासकामांचे काय होणार?
प्रत्येक गावातील प्रश्न, नागरिकांच्या मागण्या आणि विकासकामांचा प्रत्यक्ष पाठपुरावा करण्यासाठी वेळेची मर्यादा निर्माण होण्याची शक्यता आहे.विशेषतः १० ते ११ ग्रामपंचायतींचा कारभार एकाच प्रशासकाकडे असल्याने संबंधित अधिकारी प्रत्येक गावाला किती वेळ देऊ शकतील आणि विकासकामांच्या अंमलबजावणीवर त्याचा काय परिणाम होईल, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
१६-१
कुणाकडे किती ग्रामपंचायती?
भरत मोहिते - ११
प्रशांत दहिफळे -१०
चांगदेव मुंढे -१०
भरत मोरे - ६
शरद काटमोरे - ६
संजय कुसाळकर - ५
अनिल जऱ्हाड - ४
उमेश सूर्यवंशी - ४
सचिन सरोदे - ४
नंदा सोळंके - ४
मनीषा वाघचौरे - ३
पोपट त्रिभुवन - २
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.