नाशिक

नागरी वस्त्यांमधील भंगार दुकाने शहराबाहेर स्थलांतरित करा,रस्ते मोकळे करा! समीर भुजबळ यांच्या सूचना,येवल्यातील आगग्रस्त भागाची पाहणी करत केली मदत

CD
पान-३ मेन फोटो-27455 येवला : भंगार दुकानाला लागलेल्या आगीतील नुकसानीची पाहणी करताना माजी खासदार समीर भुजबळ व पदाधिकारी. भंगार दुकाने शहराबाहेर स्थलांतरित करा! समीर भुजबळ यांच्या सूचना; येवल्यातील आगग्रस्त भागाची पाहणी सकाळ वृत्तसेवा येवला, ता. ९ : आगीत नुकसानग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना अन्नधान्याची तातडीने मदत दिली जाईल तसेच यापुढे आर्थिक मदतही मिळवून देऊ, असे आश्वासन माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिले. अशा प्रकारच्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी नागरी वस्त्यांतील भंगार गुदामे व दुकानाबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार करून ती शहराबाहेर स्थलांतरित करण्याची कार्यवाही करावी, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले. शहरातील अंबिया शहा कॉलनी परिसरात भंगार गुदामाला लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर श्री. भुजबळ यांनी घटनास्थळी भेट देऊन आगग्रस्त परिसराची पाहणी करत नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आजूबाजूच्या नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने अन्नधान्याची मदत उपलब्ध करून देण्यात आली. यापुढेही गरजेनुसार मदत उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यानी दिली. शहरातील वाढती लोकसंख्या व अरुंद रस्त्यांमुळे आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दल, रुग्णवाहिका, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना अडथळे येऊ नयेत, यासाठी रस्त्यांवरील अतिक्रमणे, अडथळा ठरणारी दुकाने तसेच अनधिकृत बांधकामे हटवावीत, अशी भूमिका त्यांनी मांडली. छोटे व्यावसायिक आणि हातगाडीधारक यांचा विचार करून पालिकेने स्वतंत्र हॉकर झोन निर्माण करावेत. अतिक्रमण हटविताना व्यावसायिकांचे सहकार्य घेऊन नियोजनबद्ध कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. दुर्घटनेनंतर उपाययोजना करण्याऐवजी भविष्यात अशा घटनाच घडू नयेत, यासाठी कायमस्वरूपी नियोजन करावे, पालिकेने स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या समन्वयातून कार्यवाही करावी, असे आवाहनही त्यांनी केले. पालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, ज्येष्ठ नेते संभाजी पवार, दत्ता निकम, दीपक लोणारी, जावेद लखपती, अमजद शेख, गोटू मांजरे, वकील शेख, एजाज शेख ,निसार शेख, गुड्डू जावळे, मलिक शेख, सोहेल मोमिन, नितीन गायकवाड आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dairy Chairman Election High Court Ruling : 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीत सर्वात मोठा ट्विस्ट; मतदानापूर्वी कोर्टाचा निकाल, बदलले सत्तेचे गणित!

Gokul Politics : "गोकुळचं दार मी उघडलं म्हणून..."; महायुतीच्या दोन बड्या मंत्र्यांवर सतेज पाटलांचा थेट प्रहार!

AI Hallucination: धक्कादायक! सरकारी आदेशातच चक्क सुप्रीम कोर्टाचे बनावट निकाल? मुंबई उच्च न्यायालयाने काय केले पाहा...

Maharashtra Live News: मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध; मेढ्यात भाजप कार्यकर्ते व नागरिकांचा भव्य मोर्चा, कठोर कारवाईचा इशारा

Diwali Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँकांना सुट्ट्यांची मेजवानी! महाराष्ट्रासह 'या' ३ राज्यांत राहणार बंद; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT