Shinde Toll Plaza esakal
नाशिक

Nashik: शिंदे टोल नाक्यावर आजपासून टोल महागला; 20 km आतील नागरिकांसाठी मासिक पास

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक- पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाक्यावरील टोल करात मध्यरात्रीपासून वाढ झाली आहे. त्यामुळे नाशिक- पुणे महामार्गावरून जाणाऱ्या शहर जिल्ह्यातील नागरिकांना सणासुदीत भुर्दंड वाढणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी ही दरवाढ जाहीर केली असून पूर्ण झालेल्या प्रकल्पापैकी २५ किलोमीटर अंतरासाठी हे दर जाहीर करण्यात आले आहे. या नवीन दरवाढीनुसार स्थानिकांसाठी मासिक पासची रक्कमही आता ३१५ रुपये झाली आहे. (Toll increased at Shinde toll booth from today Monthly pass for citizens within 20 km Nashik Latest Marathi News)

नाशिक महापालिका हद्दीपासून केवळ पाच किलोमीटर अंतरावर नाशिक पुणे महामार्गावर हा टोलप्लाझा उभारण्यात आला आहे. नाशिक -पुणे महामार्ग क्रमांक ६० वर सिन्नर ते नाशिक या भागातील मार्गाचे बांधा, वापरा, हस्तांतरित करा, या योजनेतून चौपदरीकरण झाल्यानंतर १० नोव्हेंबर २०१७ पासून या मार्गावर वाहनांना टोल आकारणी लागू झाली आहे. टोलप्लाझापासून २० किलोमीटर परिघातील रहिवाशांना स्थानिक सवलतीचा लाभ दिला जातो.

या टोलप्लाझापासूनच्या २० किलोमीटरच्या परिघात जवळपास निम्मे नाशिक शहर येते. मात्र, स्थानिक नागरिकांना असलेली सवलत केवळ नाशिक रोड भागातील रहिवाशांना दिली जाते. यावरून बरेचदा वाद व आंदोलन झाले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग विभाग व सिन्नर-नाशिक टोल वेज लिमिटेड या कंपनीमध्ये २ मार्च २०१६ ला झालेल्या करारानुसार ही ही टोल आकारणी केली जाते व दरवर्षी टोलकरामध्ये वाढ जाहीर केली जाते. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग विभागाने नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे येथे टोल नाका येथून जाणाऱ्या वाहनांसाठी नवीन दर जाहीर केले आहेत. नेहमीप्रमाणे वाहनाच्या प्रकार, एकेरी वाहतूक, २४ तासांत माघारी येणाऱ्यांसाठी सवलत व मासिक पास यांच्यात दरवाढ जाहीर केली आहे.

वाहन प्रकार एकेरी स्थानिक वाहनांसाठी

कार जीप व्हॅन ४० रुपये २० रुपये
मिनी बस ६५ ३५
बस - ट्रक १४० ७०
व्यावसायिक एक्सेल १५० ७५
चार ते सहा ॲक्सेल २१५ ११०
सातहून अधिक ॲक्सल २६५ १३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT