पान-४ मेन
VNI26B13115
खोरीपाडा ः दिंडोरी बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात टॉमेटोचा लिलाव शुभारंभ करताना मंत्री ना. नरहरी झिरवाळ, सभापती प्रशांत कड आदींसह संचालक मंडळ, व्यापारी, शेतकरी.
---------------
खोरीपाड्यात टोमॅटो क्रेटला १२०१ चा भाव
---------------
लिलावास सुरवात ः मालविक्रीनंतर सौदापावतीवर बाजार समितीचा शिक्का घ्या ः कड
-------------
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता.२ : दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खोरीफाटा येथील उपबाजार आवारात चालू हंगामातील टोमॅटो खरेदी-विक्रीचा शुभारंभ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, बाजार समितीचे संस्थापक अध्यक्ष गणपत बाबा व सभापती प्रशांत कड यांच्या उपस्थितीत उत्साहात झाला. अकरा शेतकऱ्यांचे प्रत्येकी एक क्रेट लिलावासाठी ठेवण्यात आले. आडतदार विकास घुगे यांनी बोली लावत प्रत्येकी क्रेटला १ हजार २५१ रुपये भाव दिला.
------------
सभापती प्रशांत कड शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले,‘ दिंडोरी तालुक्यातील टोमॅटोला राज्यासह परराज्यांत आणि देशाबाहेरही मागणी आहे. मालाच्या गुणवत्तेमुळे विविध ठिकाणचे व्यापारी खरेदीसाठी येत असल्याने खोरीफाटा बाजार समितीचे नाव देशभर पोहोचत आहे. शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्ण माल उत्पादन करून बाजार समितीचे नाव उंचावत ठेवावे. मालाची योग्य प्रतवारी करून २० किलो वजनाचे क्रेट तयार करावेत. वाहनातील मालाचे लॉट विक्रीच्या वेळी व्यवस्थित दाखवावेत. यामुळे मालाला योग्य भाव मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
संचालक गंगाधर निखाडे व माजी सभापती योगेश बर्डे यांनी शेतकऱ्यांनी माल विक्रीनंतर सौदापट्टीवर बाजार समितीचा शिक्का घ्यावा, असे आवाहन केले. बाजार समितीच्या नियमांचे पालन केल्यास भविष्यातील व्यवहारातील अडचणी सोडविण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
सुरशे डोखळे, गणपत पाटील, वणीचे उपसरपंच विलास कड, विश्वास देशमुख, बापू महाले, बाळासाहेब घडवजे, चिंधू पगार, पोलीस पाटील सम्राट राऊत, प्रकाश शिंदे, रंगनाथ गवळी, नारायण राऊत, श्रीधर महाले, महेंद्र बोरा, गोपीनाथ पाटील, मार्तंड महाले, पंडित गवळी, सोमनाथ गायकवाड, पंडित भरसट आदी उपस्थित होते. दहेगाव, वागळुद, पिंप्री अंचला, माळे दुमाला, वणी, पांडाणे, पुणेगाव, हस्ते, खोरीफाटा, पिंगळवाडी, चौसाळे, करंजखेड, घागबारी, एकलहरे, देवसाने, पांढरी, भनवड, देवळी, बिलवाडी, कोल्हेर, अहिवंतवाडी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
१६-१
परराज्यातील व्यापारीही दाखल
टोमॅटो खरेदीसाठी परराज्यातील व्यापाऱ्यांसह विकास घुगे, सुनील जाधव, गणेश उंबरे, प्रवीण सोनवणे, पिंटू साखला, पप्पू कदम, बबन गाडे, विलास उंबरे, काळू आहेर, शाम खोडे, नीलेश गाडे, विक्रम बोडके, संतोष बोडके, राहुल घुगे, केदू गांगुर्डे, कृष्णा गायकवाड, केशव चित्ते, दीपक महाले, पप्पू महाले, सागर महाले, विनायक कुडते, योगेश नागरे, मिनीनाथ पाटील, मनोहर चौधरी, भोजराज चौधरी आदी व्यापारी उपस्थित होते.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.