नाशिक

निफाड टोमॅटो दोन रुपयांनी विकायचा तरी कसा?

CD
पान-३ टोमॅटोच्या घसरत्या दराने शेतकऱ्यांची चेष्टा दोन रुपये किलोने विकायचा कसा? ः कॅरेटमागे उरतात अवघे २५ ते ४५ रुपये सकाळ वृत्तसेवा निफाड, ता.२३ ः नाशिक जिल्ह्यात टोमॅटोच्या बाजारभावाचा प्रश्न गंभीर बनला असून, २० किलोच्या कॅरेटला अवघा ८० ते १०० रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. विशेष म्हणजे टोमॅटोच्या उत्पादनाचा खर्च बाजूला ठेवला, तरी केवळ तोडणी आणि वाहतुकीसाठी कॅरेटमागे ५५ रुपये खर्च येतो. त्यामुळे विक्रीतून मिळणाऱ्या रकमेतून हा खर्च वजा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात अवघे २५ ते ४५ रुपये म्हणजे किलोमागे २ रुपये उरतात. १६-१ कॅरेटमागे ५५ रुपये खर्च टोमॅटो तोडणीसाठी कॅरेटमागे २० रुपये, तर वाहतुकीसाठी ३५ रुपये खर्च येतो. अशा प्रकारे केवळ तोडणी आणि वाहतूक यांचाच खर्च ५५ रुपये होतो. बाजारात कॅरेटला ८० रुपये भाव मिळाल्यास खर्च वजा जाता २५ रुपये, तर १०० रुपये भाव मिळाल्यास ४५ रुपये शिल्लक राहतात. २० किलोच्या कॅरेटचा हिशोब रक्कम विक्री भाव ८० ते १०० रुपये तोडणी खर्च २० रुपये वाहतूक खर्च ३५ रुपये एकूण तोडणी व वाहतूक ५५ रुपये खर्च वजा जाता शिल्लक २५ ते ४५ रुपये म्हणजे प्रतिकिलो फक्त दोन रुपये उऱतात, या दोन रुपयांत टोमॅटो विकायचा का? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. १६-१ उत्पादन खर्चाचा हिशेब बाकीच या हिशेबात टोमॅटो लागवडीसाठी केलेला खर्च, खते, औषधे, फवारणी, पाणी, मजुरी आणि इतर खर्च धरलेलाच नाही. केवळ माल तोडून बाजार समितीपर्यंत पोहोचविण्यासाठी होणारा खर्च वजा केल्यानंतर ही रक्कम उरते. त्यामुळे प्रत्यक्ष उत्पादन खर्चाचा विचार केल्यास शेतकऱ्यांच्या नुकसानीचे चित्र आणखी गंभीर होऊ शकते. टोमॅटो शेतात जास्त काळ ठेवता येत नाही. माल खराब होण्याचा धोका असल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात विक्री करावी लागते. मात्र कॅरेटमागे ५५ रुपये तोडणी आणि वाहतुकीवर खर्च होत असताना ८० ते १०० रुपयांचा विक्रीभाव शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरत नाही. एकीकडे बाजारात टोमॅटोचा भाव ८० ते १०० रुपये कॅरेट, तर दुसरीकडे तोडणी आणि वाहतुकीसाठीच ५५ रुपये खर्च; अशा परिस्थितीत टोमॅटो विकून शेतकऱ्यांच्या हातात नेमके उरते तरी काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे. १६-१ शासन करते तरी काय? टोमॅटोचे भाव गडगडल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. हजारो रुपये खर्च करून पिकवलेल्या टोमॅटोला अवघा दोन रुपये किलो भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च तर दूरच, वाहतूक आणि तोडणीचा खर्चही परवडेनासा झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची तोडणी न करता पीक शेतातच सोडून दिले आहे. शेतकऱ्यांच्या घामाला किंमत नसेल, त्यांच्या कष्टांना योग्य मोबदला मिळणार नसेल, तर शेती टिकणार कशी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. -------------

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT