टोमॅटो (Tomato) esakal
नाशिक

टोमॅटोने बाजारात खाल्ला भाव

योगेश मोरे : सकाळ वृत्तसेवा

म्हसरूळ (नाशिक) : पेठ रोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात रविवारी (ता. ५) झालेल्या लिलावात टोमॅटोच्या प्रतिजाळीला कमाल १२०० रुपये, तर किमान ९०० रुपये भाव मिळाला.

सद्यःस्थितित नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कळवण व नाशिक तालुक्यातील बाभलेश्वर, मोहगाव, गिरणारे, दिंडोरी तालुक्यातील संगमनेर व सिन्नर तालुक्यातील सोनांबे, कोनांबे व शहरालगत असलेल्या गावांमधून टोमॅटोची आवक होत आहे. यात सर्वाधिक टोमॅटो आवक ही कळवण येथून होत आहे. सध्या टोमॅटोला भावही चांगला मिळत आहे. त्यामुळे मालाची आवकही वाढली आहे. रविवारी नाशिक मार्केटमध्ये १३ हजार ५० जाळ्यांची आवक झाली. जाळीला कमाल दर १२०० रुपये, तर सरासरी ९०० रुपये दर मिळाला. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरणआहे.

किरकोळ बाजारात टोमॅटो ८० रुपये किलो

शरदचंद्रजी मार्केट यार्डमधील टोमॅटो विभागात होणारी आवक सद्यःस्थितीत थोडीफार मंदावली आहे. गुजरात राजकोट व मुंबई या भागात टोमॅटो व्यापारी पाठवीत असतो. हाच टोमॅटो किरकोळ बाजारात भाव खात असून, जवळपास ८० रुपये किलो पार गेला आहे.

कैऱ्यांची आवक वाढली

पावसाळ्यापूर्वी लोणचे टाकण्यासाठी महिलांचा कल असतो. यामुळे कैऱ्यांची बाजार समितीत आवक वाढली आहे. सध्या किरकोळ बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात कैऱ्या विक्रीसाठी येत आहेत. सिडकोच्या पवनगरमधील भाजी बाजारात कैरी खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. या बाजारात कैरी घेऊन ती दहा रुपये किलो दराने फोडून मिळते. यामुळे या बाजारात कैरी खरेदीसाठी महिलांची गर्दी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT