tomatoes file photo esakal
नाशिक

Tomato Rates Fall: टोमॅटोच्या क्रेट्‌सला 80 रुपये दर! शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकले टोमॅटो

सकाळ वृत्तसेवा

Tomato Rates Fall : टोमॅटोच्या दरात सुरू असलेली पडझड थांबायला तयार नाही. अवघ्या २० दिवसांत तब्बल अडीच हजार रुपये प्रतिक्रेट टोमॅटोच्या दराची घसरगुंडी उडाली.

यंदाच्या हंगामातील निच्चांकी ८० रुपये प्रतिक्रेट भावाने मंगळवारी (ता. ५) टोमॅटोचे भाव पुकारले गेले.

उत्पादन खर्चही निघत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर टोमॅटो फेकून निषेध केला. (Tomato Rates Fall 80 rupees for tomato crates Farmers threw tomatoes on road nashik)

टोमॅटोचे दर वाढले असताना, नेपाळमधून टोमॅटोची आयात करणारे केंद्र सरकार दर कोसळले असताना उपाययोजना करताना दिसत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

टोमॅटोची राजधानी म्हणून पिंपळगाव बाजार समितीची ख्याती आहे. बाजार समितीत सध्या सर्वत्र टोमॅटोचा बोलबाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून तब्बल दोन लाखांहून अधिक क्रेटची आवक पिंपळगाव बाजार समितीत होत आहे.

१५ दिवसांपूर्वी वीस किलो क्रेटच्या टोमॅटोला अडीच हजार रुपये भाव होता. पण आवक वाढून तसे बाजारभावाला उतरती कळा लागली आहे. नाशिक जिल्ह्यातील बंपर पीक बाजारात आले आहे.

त्याबरोबरच बंगळुरु, कोल्हार, चिंतामणी बाजारपेठेत गावठी टोमॅटोला परराज्यातून पसंती आहे. त्यामुळे बंगळुरुचा गावठी टोमॅटो नाशिकच्या टोमॅटोला भारी ठरत आहे.

नाशिकची बाजारपेठ बंगळुरुच्या टोमॅटोने काबीज केली आहे. दररोजची सुमारे दोनशे ट्रकची निकास थांबली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

टोमॅटो फेकले रस्त्यावर...

मागणीपेक्षा पुरवठा वाढल्याने पिंपळगाव बाजार समितीत यंदाच्या हंगामातील निच्चांकी 80८० रुपये प्रतिक्रेटचा दर व्यापाऱ्यांनी पुकारले. उत्पादन नव्हे, वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला.

चांगला दर मिळेल, या अपेक्षने दुष्काळी स्थितीत टँकरने पाणी देऊन शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पीक फुलविले, पण त्या कष्टावर कोसळलेल्या बाजारभावाने पाणी फिरले आहे.

संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव सुरू होताच रस्त्यावर टोमॅटो फेकून देत संताप व्यक्त केला. दरवाढ असताना, आयातीचे धोरण स्वीकारणारे केंद्र शासन आता भाव कोसळल्यानंतर मूग गिळून गप्प का, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT