नाशिक

तोरणा किल्ला प्रतिकृती

CD
धुळे टुडे २ साठी... --- फोटो-NSK26H34764 हरणमाळ : छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थी- शिक्षकांनी साकारलेल्या तोरणा किल्ल्याची प्रतिकृती पाहतांना संस्थेचे चेअरमन सुभाष देवरे व इतर मान्यवर. --- छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूलमध्ये तोरणा किल्ला --- विद्यार्थी-शिक्षकांनी साकारली प्रतिकृती सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ९ : विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक वारशाची जाणीव निर्माण व्हावी, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्वराज्याची संकल्पना आणि गड-किल्ल्यांचे महत्त्व समजावे, या उद्देशाने शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या हरणमाळ येथील छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल येथे विद्यार्थी-शिक्षकांनी ऐतिहासिक तोरणा किल्ल्याची भव्य व आकर्षक प्रतिकृती साकारली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे प्रत्यक्ष दर्शन घडवून आणले. किल्ल्याची तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वार, बालेकिल्ला, डोंगररांगा तसेच किल्ल्याची भौगोलिक रचना यांचा बारकाईने अभ्यास करून प्रतिकृती तयार करण्यात आली. विद्यार्थ्यांनी कल्पकता, कलात्मकता आणि मेहनतीच्या जोरावर तोरणा किल्ल्याचे हुबेहूब स्वरूप उभे करण्याचा प्रयत्न केला. तोरणा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या प्रारंभी जिंकलेला महत्त्वपूर्ण किल्ला असून त्याला ऐतिहासिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. या किल्ल्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिवकालीन इतिहास, गनिमी कावा, दुर्गसंवर्धन आणि स्वराज्य स्थापनेमागील प्रेरणादायी विचारांची माहिती मिळाली. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी केवळ प्रतिकृती तयार केली नाही, तर संघभावना, नेतृत्वगुण, नियोजन, कल्पकता, सहकार्य आणि श्रमप्रतिष्ठा यांसारखी जीवनोपयोगी कौशल्येही आत्मसात केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून या उपक्रमाला प्रोत्साहन दिले. संस्थेचे चेअरमन सुभाष देवरे, उपाध्यक्ष विलास देवरे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या अश्विनी देवरे, प्राचार्य आशिष काटे यांनी विद्यार्थी- शिक्षकांचे कौतुक केले. ---

Political Statement by MP Omraje Nimbalkar : "दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर..."; ठाकरेंना सोडचिठ्ठी देणाऱ्या बड्या खासदाराच्या वक्तव्याने खळबळ!

U19 IND vs U19 PAK: रोमहर्षक सामन्यात भारताचा पराभव! हमजा जहूरच्या पाकिस्तानचा विजय, आता Asia Cup सेमीफायनलसाठी समीकरण काय?

MPSC Success Story: सहा वेळा अपयश, तरी जिद्द सोडली नाही! नांदेडचा ओमकेश झाला क्लास वन अधिकारी; आईच्या मांडीवर डोकं ठेवताच अश्रू अनावर

Latest Marathi News Live Update: : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिव्यांग बांधवांसोबत साजरी केली आनंददायी दिवाळी; 'नंदनवन' बंगल्यावर फराळ वाटप करत दिल्या शुभेच्छा

Siddi Community Marathi Song Viral Video : आफ्रिकन लूक अन् अस्सल मराठी गावरान ठसका; माठावर ठेका धरत सिद्दी तरुणांनी गायले ‘हिरो होंडा’ गीत

SCROLL FOR NEXT