Tourism News
Tourism News esakal
नाशिक

Tourism Trends of Nashikkar : राज्यात कोकण, देशात केरळ, तर परदेशात सिंगापूर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोनानंतर नाशिककर मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी बाहेर पडले असून, पर्यटकांच्या संख्येने गर्दीचे विक्रम मोडीत काढताना लॉकडाउनचा बॅकलॉगही भरून काढला आहे. नाशिकच्या पर्यटकांचे राज्यातील कोकण, देशात देवभूमी केरळ, तर प्रदेशात सिंगापूर, मॉरिशसला पसंती मिळाली. (Tourism Trends of Nashikkar Konkan in state Kerala in country Singapore in abroad tourism increased Nashik News)

२०२० व २०२१ या दोन वर्षांनी नाशिकचे पर्यटन जवळपास संपुष्टात आले. या क्षेत्रातील अनेक मातब्बरांनी पर्यटनाला रामराम ठोकत अन्य व्यवसाय स्वीकारला. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे पर्यटनाची गाडी स्थिरस्थावर होण्यासाठी अधिक कालावधी लागेल, ही बाब हेरून अनेक जण या व्यवसायातून बाहेर पडले. मात्र, कोरोना नियंत्रणात आल्यानंतर उलट परिस्थिती बघायला मिळत आहे.

यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत नाशिककर मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. पर्यटनाची ही गर्दी मागील सर्व विक्रम मोडणारी आहे. पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता, या व्यवसायाला राम राम ठोकणारे पुन्हा माघारी आल्याचे चित्र दिसत आहे. पर्यटकांची गर्दी वाढल्याने पर्यटन क्षेत्राचा आलेख चढा राहिला. नाशिक शहरात नोंदणीकृत १२५, तर त्याव्यतिरिक्त अनोंदणीकृत जवळपास १०० ट्रॅव्हल्स संस्था आहेत. या संस्थांकडून मोठ्या प्रमाणात बुकिंग झाले.

त्याव्यतिरिक्त खासगी लोक पर्यटनाला गेले. पर्यटनासाठी ठराविक सीजन महत्त्वाचे मानले जात होते. मात्र, यंदा सीजन हा विषय पर्यटकांनी संपुष्टात आणला आहे. जानेवारी महिन्यापासून ते आतापर्यंत ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या सर्वच तारखा बुक राहिल्या.

या पर्यटनस्थळांना नाशिककरांची पसंती

महाराष्ट्रातील कोकण विभागाला पर्यटकांनी यंदाही पुन्हा पसंती दिली. एकूण पर्यटकांच्या जवळपास २० ते २५ टक्के पर्यटक कोकणात पोचले. गोवा स्वतंत्र राज्य असले, तरी महाराष्ट्रापासून जवळचे अंतर असल्याने कोकणनंतर नाशिककरांची पसंती गोव्याला मिळाली. देशात देवभूमी केरळ राज्यामध्ये व त्यातही दक्षिण केरळ भागाला पर्यटकांची पसंती मिळाली. त्यानंतर अंदमान व राजस्थान भागात पर्यटक गेले. परदेशात सिंगापूर, थायलंड, मलेशिया, बर्मा, मॉरिशस व श्रीलंकेला पर्यटकांची पसंती मिळाली.

श्रीलंकेमध्ये आणीबाणीची परिस्थिती असल्याचे माध्यमातून दिसून येत असले, तरी या देशाचा मुख्य व्यवसाय पर्यटन आहे. त्यामुळे आणीबाणीच्या परिस्थितीत येथील सरकारने तातडीने उपाययोजना करत पर्यटन हा व्यवसाय पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणले. श्रीलंकेत दूधही मिळत नाही, हे भारतात बसून ऐकायला मिळाले. प्रत्यक्षात मात्र तेथे तशी परिस्थिती नसल्याचे पर्यटकांनी सांगितले.

गुगलवर नाशिकचे आघाडी

पर्यटनाच्या नकाशावर नाशिकने आघाडी घेतली आहे. गुगलवर धार्मिक पर्यटनस्थळांच्या यादी पाहताना नाशिक आघाडीवर दिसून आले. शिर्डी व औरंगाबाद भागातील पर्यटनस्थळे सर्च करताना नाशिक, त्र्यंबकेश्वर, सापुतारा, सप्तशृंगी गड ही पर्यटनस्थळे गुगलवर आघाडीवर दिसून आली.

"या वर्षाच्या पर्यटनाने मागील दोन वर्षांचा बॅकलॉग भरून काढला आहे. पर्यटन नकाशावर नाशिक आघाडीवर आल्याचे या वर्षी दिसून आले. पर्यटनात नाशिककरांची पसंती राज्यातील कोकण व केरळला दिसून आली."

-दत्ता भालेराव, माजी अध्यक्ष ट्रॅव्हल एजंट असोसिएशन, नाशिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT