NRS26B02402
नगरसूल (ता. येवला) ः येथील येवला- नांदगाव राज्य महामार्गांवर रेल्वेच्या भुयारी मार्गात उलटलेला उसाचा ट्रॅक्टर.
------------------
रेल्वेच्या भुयारी मार्गात
उसाच्या ट्रॉली उलटल्या
---------
येवला- नांदगाव मार्गावर वाहतूक विस्कळीत
सकाळ वृत्तसेवा
नगरसूल, ता. १९ : येथील येवला- नांदगाव राज्य महामार्गावर नगरसूल रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या रेल्वेच्या भुयारी मार्गात ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि त्याला जोडलेल्या उसाने भरलेल्या दोन ट्रॉली उलटल्याची घटना घडली. या अपघातामुळे येवला- नांदगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
चाळीसगाव येथून उसाने भरलेल्या दोन ट्रॉली कोळपेवाडी येथे घेऊन जाणारा ट्रॅक्टर नांदगावच्या दिशेने येत होता. नगरसूल रेल्वे स्थानकाजवळील भुयारी मार्गात प्रवेश करताना उतारावर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे उसाने भरलेल्या अवजड ट्रॉली ट्रॅक्टरला मागून ढकलत गेल्या आणि रस्त्यावर उलटल्या. या घटनेत चालक सुदैवाने बचावला. मात्र, ट्रॅक्टर, ट्रॉली आणि उसाचे नुकसान झाले. भुयारी मार्गात रस्त्यावरच दोन्ही ट्रॉली उलटल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. परिणामी येवला- नांदगाव मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली. वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांसह वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला.
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.