नाशिक

५७ लाखांच्या(ट्रेड प्रॉफिट फंड) फसवणुकीप्रकरणी ओझर पोलिसांची धडक कारवाई;

CD
पान-१ मेन OZM26B14840 ओझर : ५७ लाखांच्या (ट्रेड प्रॉफिट फंड) फसवणुकीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांसह ओझर पोलिस पथक ------------- ट्रेड प्रॉफिट फंड नावाने ५७ लाखांचा गंडा ------------- फसवणूकप्रकरणी टोळीचा पर्दाफाश ः ओझर पोलिसांकडून गुजरात, छत्तीसगडमधून तिघांना अटक ---------- सकाळ वृत्तसेवा ओझर, ता.१२ ः गुन्हेगारांनी कितीही खोटी नावे धारण करून आपली ओळख लपवली, तरी खाकी वर्दीचा ससेमिरा चुकवणे सोपे नसते, हे ओझर पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ''ट्रेड प्रॉफिट फंड (TPF)'' आणि जुन्या, बंद झालेल्या दोन हजारांच्या नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने तब्बल ५७ लाखांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा ओझर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गुजरात व छत्तीसगडमधून तिन्ही संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. ---------------- ​ज्ञानेश्वर रामराव कदम आणि त्यांचे सहकारी विश्वास नारायण बोरसे (रा. चामदरी, ता. दिंडोरी) तसेच राजाभाऊ चंद्रकांत पाटील आणि सुजित सुभाषराव मोरे (दोघे रा. पिंपळगाव बसवंत) यांना टोळीने जाळ्यात ओढले होते. संशयितांनी ''ट्रेड प्रॉफिट फंड'' तसेच २,००० रुपयांच्या बंद झालेल्या नोटा बदलून देण्याची बतावणी केली. लोकांचा विश्वास बसण्यासाठी दोन हजाराच्या नोटांचा खोटा व्हिडिओही दाखवण्यात आला. त्यानंतर विशेष स्लॉट बुकिंगच्या नावाखाली गुजरातमधील गांधीनगर, राजस्थानमधील जैसलमेर आणि गोव्यातील पणजी येथे बोलावून रोख व बँक खात्यामार्फत पैसे उकळण्यात आले आणि एकूण ५७ लाख रुपयांची फसवणूक झाली. ​१६-१ पोलिसांची शोधमोहीम व सापळा गुन्ह्यातील संशयितांनी खोटी नावे वापरल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते. मात्र, ओझर पोलिसांनी दोन स्वतंत्र पथके तयार करून गुजरात राज्यातील सुरत, बडोदा, गांधीनगर, अहमदाबाद आणि छत्तीसगडमधील रायपूर येथे धडक मोहीम राबवली. ​गुजरातमध्ये सलग दोन दिवस तळ ठोकून संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेतला. पुन्हा अशाच प्रकारे फसवणूक करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी अहमदाबाद विमानतळ परिसरात नियोजनबद्ध सापळा रचून दोघांना अटक केली. दुसऱ्या पथकाने रायपूर येथून तिसऱ्या संशयिताला बेड्या ठोकल्या. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात यश मिळवले आहे. ​१६-१ अटकेतील संशयित आरोपी - शैलेश रमेश औटी (संजय शर्मा या नावाने वावर, रा. नारायणगाव, जि. पुणे, सध्या रा. पणजी, गोवा. (त्याच्यावर नाशिक रोड, घाटकोपर आणि म्हसवड येथे गुन्हे दाखल आहेत.) - मोहम्मद निजामुद्दीन मुस्तफा (मोहित ओबेरॉय या नावाने वावर, रा. दिल्ली.) - अश्विन हिरालाल पटेल (रा. रायपूर, छत्तीसगड) ------------- १६-१ ​पोलिसांचे सतर्कतेचे आवाहन ​नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी.एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एम., उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी उपनिरीक्षक रवींद्र खाडे संकेत थोरात हवा अजय मदने दुर्गेश बैरागी शिपाई जितेंद्र बागूल नीलेश वाघ प्रसाद सूर्यवंशी त्यांच्या तपास पथकाने ही धडक कामगिरी केली आहे. ---------- कोट ट्रेड प्रॉफिट फंड, बंद झालेल्या नोटा बदलून देणे किंवा पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवणाऱ्या भ्रामक योजनांना नागरिकांनी बळी पडू नये. अनोळखींना पैसे देण्यापूर्वी व्यवहाराची सत्यता पडताळून पाहावी. फसवणूक झाल्यास तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. - महेश कुलकर्णी, पोलिस निरीक्षक, ओझर पोलिस ठाणे. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

मायकल जॅक्सनला टिळा लावून स्वागत करणारी एकमेव अभिनेत्री; कसा होता तो अनुभव? सोनाली बेंद्रे म्हणाली- मी कधीच.

SCROLL FOR NEXT