traffic jam reference image sakal
नाशिक

ताहाराबाद रस्त्यावर वाहतूक ठप्प; झाड कोसळल्याने वाहनचालक त्रस्त

प्रशांत बैरागी

नामपूर (जि. नाशिक) : शहर व परिसरातील गावांमध्ये सोमवारी (ता. २७) दुपारी दोन ते तीनच्या सुमारास मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) शेतकरी सुखावला आहे. मोसम खोऱ्यात सातत्याने होणाऱ्या पावसामुळे पेरणी झालेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे ताहाराबाद रस्त्यालगत ब्राह्मणपाडे ते आसखेडा दरम्यान बाभळीचे मोठे झाड रस्त्यावर उन्मळून पडल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प (Traffic Jam) झाली आहे. (Traffic jam on Taharabad road driver due to tree fallen Nashik News)

मोसम खोऱ्यातील नामपूर, द्याने, आसखेडा, ब्राह्मणपाडे, उत्राणे, मोराणे, खिरमाणी, काकडगाव, खडकीपाडा, एकलहरे, वाघळे, वाडीपिसोळ, पिंपळकोठे, नांदीन परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली. नामपूरला सोमवार आठवडे बाजाराचा दिवस असल्याने ऐनवेळी आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. बाजारानिमित्त परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने नामपूरला येतात. पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शेतांमधील माती रस्त्यावर वाहून आल्याने ब्राह्मणपाडे गावाजवळील धोकादायक वळणावर रस्ता खराब झाला आहे. परिसरातील अनेक गावांमधील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने चार दिवसांपासून उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. पेरणीयोग्य पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT