Vehicles stuck in a traffic jam on Monday afternoon esakal
नाशिक

Nashik Monsoon Rain: पावसाचा फक्त शिडकावा अन् शहरभर वाहतूक कोंडी!

सकाळ वृत्तसेवा

Nashik Monsoon Rain : पावसाने नाशिककरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला खरा. परंतु, सोमवारी (ता. २६) दिवसभर शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. अनेक चौकांमध्ये वाहनांच्या रांगा लागल्याने अनेकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.

पावसाच्या फक्त शिडकाव्याने शहरातील चौकांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असेल तर पावसाचा जोर वाढल्यावर काय, असा प्रश्‍न त्रस्त वाहनचालकांसमोर आत्ताच उभा राहिला आहे. (traffic jams across city after Nashik Monsoon Rain)

नाशिककरांना लांबलेल्या पावसाची अगतिकतेने प्रतिक्षा होती. सोमवारी पहाटेपासून शहरात पावसाने रिमझिम स्वरूपात हजेरी लावली. दिवसभर असाच रिमझिम सरी पडत राहिल्या. मात्र पावसाच्या या शिडकाव्याने शहरातील वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.

स्मार्टसिटी प्रकल्पानंतर सुरू असलेली कामे, आणि नॅचरल गॅस पाइपलाइनचे सुरू असलेल्या खोदकामामुळे शहरात अनेक ठिकाणी खड्डेमय परिस्थिती आहे. यामुळे पावसाच्या पहिल्याच शिडकाव्याने शहरातील रहदारीच्या समस्या उघड्यावर आल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

द्वारका सर्कल, सारडा सर्कल, शालिमार चौक, सीबीएस चौक, अशोकस्तंभ, जुना गंगापूर नाका, सीटी सेंटर मॉल, मुंबई नाका सर्कल, मायको सर्कल, उपनगर नाका सिग्नल याठिकाणी पावसामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.

पावसाने हजेरी लावल्याने रस्त्यावरही चारचाकी वाहनांची संख्या वाढली. त्याचा अतिरिक्त परिणाम वाहतूक नियंत्रणावर झाला. अनेक चौकांमध्ये वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.

याचा मनस्ताप वाहनचालकांना सहन करावा लागला. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी चौकांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली होती. त्याच वेळेत शाळा-महाविद्यालयांच्या वाहनांचीही गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडीत आणखीच भर पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT