crime News  esakal
नाशिक

Nashik Crime News : वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की; आरोपीला कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी छोटा हत्ती वाहनचालकासह त्याच्या दोघा साथीदारांना जिल्हा न्यायालयाने कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा व ७ हजार रुपयांच्या दंड सुनावला. सदरील घटना गेल्या १३ जुलै २०१४ रोजी गंगापूर नाक्यावरील इंद्रप्रस्थ हॉलजवळ घडली होती. (Traffic police beaten up Accused sentenced till court Nashik Crime News)

शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी जी. एस. महाले, त्यांचे सहकारी एस. जी. लोंढे हे १३ जुलै २०१४ रोजी सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत जुना गंगापूर नाका येथे रहदारी नियंत्रणाच्या कर्तव्यावर होते. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जेहान सर्कलकडून जुना गंगापूर नाक्याकडे छोटा हत्ती टेम्पोवरील (एमएच १५ डीके २६३०) आरोपी चालक सचिन जगन्नाथ वाकचौरे (३६, रा. विजय चौक, पंचवटी) याने वेगाने गाडी चालवून नेली.

महाले आणि लोंढे यांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने प्रमोद महाजन गार्डनकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महाले व लोंढे यांनी त्याचा पाठलाग करून इंद्रप्रस्थ हॉलसमोर त्याला थांबविले.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

त्यावेळी सचिन वाकचौरे याच्यासह गाडीत मागे बसलेले मंगेश सुरेश जाधव (१८, रा. दत्तनगर, पंचवटी), सुरेश शंकर गुनगुने (२१, रा. विजय चौक, दत्तनगर, पंचवटी) यांना राग आल्याने महाले यांच्या मोटारसायकलला लाथा मारून खाली पाडली व त्यांना धक्काबुक्की केली.

या प्रकरणात सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या सुनावणीत मंगळवारी (ता.१४) जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. ए. शिंदे यांनी आरोपींना शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता आर. एम. बघडाणे यांनी कामकाज पाहिले. तर, तत्कालिन उपनिरीक्षक एस. ई. कांबळे यांनी तपास केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांसाठी मोठी संधी; लघु उद्योगांना पंतप्रधान मोदींचे आवाहन

Mumbai Local Megablock: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! रविवारी लोकल उशिराने धावणार, 'या' मार्गावर मेगाब्लॉक; कसे असेल नियोजन?

Koyna Dam Water Level : महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' 100 टीएमसीच्या उंबरठ्यावर! कोयना धरणात 97 टीएमसी पाणीसाठा; सांगली-सातारा अन् कर्नाटकाची चिंता मिटली

IND vs SL: भारत खेळणार 600वा कसोटी सामना; ‘या’ दोन संघांनंतर ऐतिहासिक क्लबमध्ये होणार एंट्री, कोणत्या देशाने खेळले 1000हून अधिक सामने!

Vishwas Nangare Patil: विश्‍वास नांगरे पाटील यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक, रेड्डींसह दहा पोलिस होणार सन्मानित

SCROLL FOR NEXT