फोटो क्रमांक ः 34607....विशाल सरक
फोटो क्रमांक ः 34608 किंवा 34609....सौरभ वाघमोडे
---
शालकाची मृत्यू वार्ता ऐकून निघालेल्या मेव्हण्याचाही अंत
---
तापी नदीत उडी घेत सौरभने संपवली जीवनयात्रा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ५ ः मावस शालकाच्या मृत्यूची वार्ता समजताच त्याला पाहण्यासाठी साक्रीहून धुळ्याकडे निघालेल्या मेव्हण्याचाही वाटेत अपघाती मृत्यू झाला. धुळे शहरातील धनगरवाडा परिसरातील सौरभ एकनाथ वाघमोडे (वय २३) याने मित्रांसमोरच तापी नदीत उडी घेतल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. ही वार्ता समजल्यानंतर धुळ्याकडे येणाऱ्या विशाल गोरख सरक (वय २७, रा. महिर, ता. साक्री) याचा भदाणे गावाजवळ राम हॉटेल व आश्रमशाळेसमोरील परिसरात झालेल्या अपघातात मृत्यू झाला. एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सौरभ हा धुळे पोलिस दलातील एकनाथ माणिक वाघमोडे यांचा लहान मुलगा होता. तो सोमवारी (ता. ४) रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास दुचाकीने तापी नदीवरील दभाषी पुलावर गेला. तेथून त्याने काही मित्रांना फोन करून पुलावर वाद झाल्याचे सांगितले. मित्र तत्काळ घटनास्थळी पोहोचले असता, सौरभ पुलावरून काही अंतरावर उभा होता. त्यांनी त्याला टोकाचे पाऊल उचलू नको, अशी विनंती केली. मात्र, मित्र त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्याने तापी नदीत उडी घेतली. मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. त्याच्या मागे आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.
दरम्यान, सौरभच्या मृत्यूची वार्ता समजल्यानंतर त्याचा मेव्हणा विशाल सरक साक्रीहून धुळ्याकडे येत होता. भदाणे गावाजवळ राम हॉटेल व आश्रमशाळेसमोरील परिसरात त्याच्या वाहनाला अपघात झाला. यात त्याचा मृत्यू झाला. विशाल एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होता. २०२० मध्ये सुरत-नागपूर महामार्गावरील कोंडाईबारी घाटात झालेल्या अपघातात त्याचे वडील, बहीण आणि मेव्हणे, अशा तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वडिलांच्या जागेवर त्याला एसटी महामंडळात नोकरी मिळाली होती. दीड वर्षापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. त्याच्या मागे आई आणि बहीण असा परिवार आहे. दिवाळीत शालक आणि मेव्हण्याचा अशाप्रकारे अंत झाल्याने धुळे व महिर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.