नाशिक

रुग्णवाहिकेला विलंब झाल्याने अर्भकाचा गर्भातच मृत्यू

CD
रुग्णवाहिकेअभावी सात महिन्यांच्या गर्भातील बाळाचा मृत्यू खोडाळा आरोग्य केंद्रातील प्रकार; दोन तासांच्या विलंबानंतर १०८ रुग्णवाहिका दाखल सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.१६ : वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने सात महिन्यांच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रायपाडा येथील अनिता ईरते यांच्याबाबत घडली. या प्रकरणाची दखल घेत जिल्हा परिषद आरोग्य विभागाने मोखाडा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचा अहवाल मागविला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. रायपाडा येथील अनिता ईरते या सुमारे सात महिन्यांच्या गरोदर होत्या. त्यांना पोटात त्रास जाणवू लागल्याने खोडाळा (ता. मोखाडा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, रुग्णालयात जाण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. खोडाळा आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उभी असतानाही ती उपलब्ध करून देण्यास आरोग्य अधिकाऱ्यांनी नकार दिल्याचा आरोप वसंत ईरते यांनी केला आहे. त्यानंतर १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. मात्र, ही रुग्णवाहिका पोहोचण्यास तब्बल दोन तासांचा विलंब झाला. परिणामी, अनिता ईरते यांना जिल्हा रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाला. या विलंबादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा आणि आपत्कालीन रुग्णवाहिका व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने या प्रकरणाची दखल घेत खोडाळा आरोग्य केंद्राकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविला आहे. अहवालाच्या आधारे पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. कोट मोखाडा येथील आरोग्य अधिकाऱ्यांकडे खोडाळा आरोग्य केंद्राविषयी अहवाल मागविला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर घटनेचा उलगडा होईल. त्याआधारे पुढील कार्यवाही करण्यात येईल. - डॉ. देसले, तालुका आरोग्य अधिकारी, त्र्यंबकेश्वर

Shivneri Sugars : सातारा जिल्ह्यात ऊसदराची कोंडी अखेर फुटली; शिवनेरी शुगर्सने ३९०० रुपये पहिली उचल जाहीर करताच स्वाभिमानीचे आंदोलन पाच दिवस स्थगित

Gold Price: हॉलमार्क असलेलं सोनं खरंच शुद्ध असतं का? CAG च्या अहवालाने उघड झाला सरकारी यंत्रणेचा ढिसाळपणा

Latest Marathi News Update: सातारा रस्त्यावर उद्या वाहतूक बदल

Syed Mushtaq Ali Trophy: संजू सॅमसनची तुफानी फटकेबाजी अन् मग निधीशच्या ५ विकेट्स; महाराष्ट्राचा केरळकडून दारुण पराभव!

Professor Recruitment Issue : प्राध्यापक भरतीचा मुहूर्त कधी? नऊ महिन्यांपासून प्रक्रिया रखडली; नेट-सेट, पीएच.डी.धारकांचे पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन

SCROLL FOR NEXT