नाशिक

मालेगावजवळ अपघातात तिघांचा मृत्यू

CD
पान-१ ----------- राजेंद्र माने ः MLN26B16175 बालाबाई माने -MLN26B16176 भटाबाई माने - MLN26B16177 ------ MLN26B16178 मालेगाव : अपघातात मृत्यमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करताना शिक्षणमंत्री दादा भुसे. ----------------- माता-पित्यासह मुलीचा अपघाती मृत्यू --------- टिंगरीजवळ टेम्पोची धडक ः वरसंशोधनाहून परतताना घटना ------------ सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता.२९ : मालेगाव- कुसुंबा रस्त्यावर टिंगरी वनपट फाट्याजवळ भरधाव पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने मातापित्यासह मुलीचा मृत्यू झाला. हे तिघे तिसगाव-ढंडाणे (ता. धुळे) येथील रहिवासी असून मुलीसाठी वर पाहण्यासाठी नांदगाव येथे गेले होते, तेथून दहिदी मार्गे परतत असताना हा अपघात झाला. एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान पीकअपचालकाला ताब्‍यात घेण्यात आले असून पीकअपही जप्त करण्यात आला आहे. ------------------ या घटनेची माहिती समजाताच शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पिडित कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. पोलिसांनी पिकअपचालकाला ताब्यात घेतले आहे. तालुका पोलिस ठाण्यात चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव - कुसुंबा रस्ता हा पुर्णपणे सिमेंट कॉंक्रीटीकरण झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दोन महिन्यापुर्वी मालेगावसह परिसरात तीन अपघात झाले. राजेंद्र नाना माने (वय ४५), बालाबाई राजेंद्र माने (वय ३५), भटाबाई राजेंद्र माने (वय १८) हे तिघे जण दुचाकीने (एमएच १८ एएल २१५०) नांदगावहून धुळे जिल्ह्यातील चिंचवार येथे जात होते. तिघांवर काळाने झडप घातली. त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअपने (एमएच ०४ एचवाय ०२०३) जबर धडक दिली. अपघातात तिघे गंभीर जखमी झाले. रुग्णवाहिकाचालक धिरज कचवे याने त्यांना तातडीने सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. पोलिसांनी पिकअपचालक सागर यशोनाथ थोरात (वय २७, रा. कंक्राळे, ता. मालेगाव) याला ताब्यात घेतले. पिकअपदेखील जप्त करण्यात आली आहे. सदर घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक दामोदर काळे करीत आहेत. ----- चौकट शिक्षणमंञ्यांची भेट घटनेची माहिती समजताच शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सामान्य रुग्णालयात जाऊन अपघातात मृत्यमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. अपघाता संदर्भात पोलिसांशी चर्चा करुन कारवाई करण्याच्या सूचना केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Youth Congress Protest in Karad Against Sanjay Gaikwad : शेतकऱ्यांच्या वक्तव्याचा निषेध; कऱ्हाडमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या पुतळ्याला मांसाचे तुकडे अडकवत युवक काँग्रेसचे आक्रमक आंदोलन

Sakal Impact : 'सकाळ' इम्पॅक्ट; एमपीएससी गैरव्यवहार चौकशीला अखेर मुहूर्त, १६ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आवाहन

MPSC Student : आर्थिक कोंडीमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी धरली गावाची वाट; अभ्यासिका पडल्या ओस?

Pattankodoli Birdev Yatra Farande Baba Bhakanuk : राज्यासह केंद्रात राजकीय उलथापालथ होईल, देशात आंदोलने होतील; पट्टणकोडोली फरांडे बाबांची भाकणूक उत्साहात संपन्न

Diwali Water Supply Update in Pune : दिवाळीत पुणेकरांना मोठा दिलासा; ५ नोव्हेंबर रोजीची गुरुवारची पाणी कपात रद्द, सुरळीत पाणीपुरवठा होणार

SCROLL FOR NEXT