PLS26B01955 ः अपघातग्रस्त दुचाकी
----------------
पीकअपने धडक दिल्याने
पिता ठार, मुलगा गंभीर
---------------
सुरगाण्याजवळ अपघात ः दुसरा जखमी
----------
सकाळ वृत्तसेवा
पळसन, ता.११ ः मालवाहू पिकअप आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीने दोन मुलांना घेऊन जाणाऱ्या वडिलांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका गंभीर जखमी मुलावर उपचार सुरु आहेत. हा अपघात शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान उंबरपाडा (सु.) जवळ झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीरामपूर (गांडूरमाळ) येथील जानकीदास भैयाजी राऊत (४५) हे आपली मुले अमित (११) आणि विशाल राऊत (१४) यांना घेऊन सप्तशृंगगडावर दुचाकीने (जीजे ३०, बी ४३३४) गेले होते. सुरगाण्याकडे येत असताना सुरगाणा - उंबरठाण रस्त्यावरील उंबरपाडा (सु.) जवळील फरशीपुलाजवळ आले असता विरुद्ध दिशेने गुजरातकडे जाणारी कांद्याने भरलेली पीकअप (एमएच १५, केएस ५०५९) आणि दुचाकीत संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान अपघात झाला. यात वडील जानकिदास राऊत आणि अकरा वर्षीय अमित गंभीर जखमी झाले. विशाल किरकोळ जखमी झाला. त्यांना तातडीने सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर गंभीर जानकीदास आणि अमित यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान रविवारी (ता.११) पहाटे पाचच्या दरम्यान जानकीदास यांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पीकअपचालक केशव संजय गांगुर्डे (२६, रा. गुगुळ, ता. सुरगाणा) यास ताब्यात घेतले आहे. जानकीदास यांची पत्नी यशोदा राऊत यांनी फिर्याद दिली असून पोलिस निरीक्षक घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप पगारे तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.