NSK26H31559 प्रशांत सोनवणे
---
छळाला कंटाळून तरुणाने घेतला गळफास
---
मावस बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध केल्याचा राग; मोबाईलमधील व्हिडिओत तिघांची नावे
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : देऊलवाडे (ता. जळगाव) येथील २८ वर्षीय तरुणाने मंगळवारी (ता. ६) असोदा रोडवर उड्डाणपुलालगत शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मावस बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध केल्याच्या रागातून माय-लेकांसह तिघांकडून धमक्या आणि छळ असह्य झाल्याने प्रशांत सोनवणे याने गळफास घेतला.
असोदा (ता. जळगाव) उड्डाणपुलाजवळील गवळी मुजोबा मंदिरामागील शेताच्या बांधावरील झाडाला दोरीच्या साहाय्याने तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत मंगळवारी (ता. ६) सकाळी आढळला. त्याला ग्रामस्थांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात नेले. तपासणीअंती डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
घटनेनंतर प्रशांतचा मोबाईल तपासला असता, त्यात त्याने तयार केलेला व्हीडीओ आढळला. व्हिडिओमध्ये त्याने अहिराणी भाषेत सांगितले, की संदीप महाजन, विशाल महाजन व त्यांची आई यांच्या त्रासामुळे मला फाशी घ्यावी लागत आहे. अमर किरण सोनवणे (वय २३, रा. देऊळवाडे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रशांतच्या मावस बहिणीचे संदीप महाजन याच्यासोबत प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधाला प्रशांतचा विरोध असल्याने संदीप महाजन, विशाल महाजन व त्यांची आई (सर्व रा. तुकारामवाडी, जळगाव) प्रशांतला वारंवार भेटून धमक्या देत होते. सततच्या त्रासाला व मानसिक छळाला कंटाळून प्रशांतने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असून, तिघांविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक विजय पाटील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.