Late Nurse Madhuri Topale  esakal
नाशिक

प्रशिक्षणार्थी परिचारिकेची गळफास घेत आत्महत्या

नरेश हाळणोर

नाशिक : जिल्हा रुग्णालय (District Hospital) आवारात असलेल्या होस्टेलमध्ये प्रशिक्षणार्थी परिचारिकेने (Trainee Nurse) बुधवारी (ता. १५) पहाटे रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. माधुरी काशीनाथ टोपले (वय १९, रा. वांगण, पो. फळसण, ता. सुरगाणा), असे आत्महत्या केलेल्या प्रशिक्षणार्थी परिचारिकेचे नाव आहे. (Trainee nurse commits suicide by hanging herself at District Hospital Nashik News)

पोलिसांच्या माहितीनुसार, माधुरी ही परिचारिका अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या होस्टेलमध्ये माधुरी राहायला होती. मंगळवारी (ता. १४) रात्री मैत्रिणीच्या वाढदिवस साजरा केल्यानंतर ती तिच्या रूममध्ये गेली. तर पहाटेच्या सुमारास माधुरीने अज्ञात कारणातून रूममधील फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. संबंधित बाब सकाळी सातच्या सुमारास निदर्शनास आली. तेथील कर्मचाऱ्यांनी तातडीने तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. बोरा यांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून काहीही मिळून आलेले नाही. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाईल जप्त

माधुरीच्या आत्महत्येमागील कारण अस्पष्ट असून, सरकारवाडा पोलिसांनी तिचा मोबाईल जप्त केला आहे. माधुरीचे आई-वडील शेतकरी असून, त्यांना चार मुली. यात माधुरी धाकटी होती. तिच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. माधुरीच्या मोबाईलमधील माहितीतून पोलिसांच्या हाती काय लागते, त्यातून तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT