Nashik Police Commissionerate esakal
नाशिक

Nashik Police Transfer: शहर आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांचा बदल्या; कही खुशी-कही गम

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Transfer : ग्रामीण पोलिस दलानंतर आता शहर पोलिस आयुक्तालयातील शिपाई ते सहायक पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अंमलदाराच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस प्रशासन विभागाने आयुक्तालयातील २४० कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

दरम्यान, विनंती अर्ज करून बदली मागणाऱ्या अंमलदाराच्या बदलीचा विचार न झाल्याने ‘कही खुशी, कही गम’ अशी कर्मचाऱ्यांमध्ये वातावरण आहे. (Transfer of City police Commissionerate nashik news)

शहर आयुक्तालयातील १४ पोलिस ठाणे व इतर विभागांत ठरलेल्या मुदतीत सेवा बजावलेल्या अंमलदाराच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत. निर्धारित कालावधी पूर्ण केलेल्या अंमलदाराच्या अर्जातील पसंतीक्रमानुसार सदरच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

नियंत्रण कक्ष, गुन्हे शाखा व त्यांची पथके, पोलिस ठाणे, मुख्यालय, महिला सुरक्षा विभाग, वाहतूक विभाग, विशेष शाखा, अतिक्रमण विभाग, बॉम्ब शोधक व नाशक पथक, जलद प्रतिसाद पथक, मोटार परिवहन विभागातील अंमलदारांचा यात समावेश आहे.

तसेच सेवानिवृत्तीमुळे मुख्यालय, विशेष शाखा, गुन्हे शाखा व नियंत्रण कक्षातील दोन सहायक उपनिरीक्षक, दोन श्रेणी उपनिरीक्षक, सहा हवालदारांसह एक पोलिस नाईक यांना एक वर्ष स्थगिती देण्यात आली आहे.

दरम्यान, बऱ्याच अंमलदारांनी विनंती अर्ज करीत, त्यांनी त्यांच्या सोयीनुसार बदलीची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने विनंती अर्जांचा विचार न केल्याने अशा अंमलदारांमध्ये नाराजीची भावना आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बदली करण्यात आलेले अंमलदार

पोलिस शिपाई १३३

पोलिस नाईक ४८०

हवालदार ४०

सहायक उपनिरीक्षक १५

श्रेणी उपनिरीक्षक ०४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Minor Girl Assault Case : पुणे, नाशिकनंतर आता सांगली जिल्हा हादरला!, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार, मुलीस लॉजवर नेलं अन्...

बॅटिंग vs बॅटिंग कमिन्सची चाणक्यनीती की श्रेयसचा पलटवार? 'नंबर १' च्या खुर्चीसाठी आज महासंग्राम, पहा कशी असेल Playing 11

Nashik Bribe Case : नाशिकमध्ये 50 हजारांची लाच घेताना महिला मंडल अधिकारी ACB च्या जाळ्यात; न्यायालयीन आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मागितली लाच

Thalapathy Vijay: “आईसारखं प्रेम दिलं…”; विजयचा प्रत्येकाने एकदा वाचावा असा भावनिक संदेश! निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच बोलले?

Arvind Kejriwal: 'मोदी सरकारचा अंत पंजाबमधून होईल’; अरविंद केजरीवाल यांची दावा, भाजपवर जोरदार निशाणा!

SCROLL FOR NEXT