Pournima
Pournima esakal
नाशिक

Nashik News : पोलिस उपायुक्‍त पौर्णिमा चौघुले श्रींगी यांची बदली

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : येथील पोलिस आयुक्‍तालयात कार्यरत असलेल्‍या उपायुक्‍त पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांची मंगळवारी (ता.२८) बदली करण्यात आली आहे.

गृह विभागाच्‍या आदेशानुसार मीरा -भाईंदर -वसई -विरार पोलिस आयुक्तालयात उपायुक्त या पदावर त्‍यांची नियुक्ती जाहीर केली आहे. त्‍यांच्‍या बदलीने रिक्‍त झालेल्‍या उपायुक्‍त पदावर अन्‍य अधिकाऱ्यांची नियुक्‍ती दिलेली नाही. (Transfer of Deputy Commissioner of Police Poornima Chowghule Shringi Nashik News)

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

पदस्‍थापनेच्‍या प्रतीक्षेतील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या गृह विभागाने केलेल्‍या आहेत. यापैकी पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांचीही बदली करण्यात आलेली आहे. या बदलीमुळे रिक्‍त झालेल्‍या जागेवर पदस्थापनेचे आदेश येत्‍या काही दिवसांत जारी होण्याची शक्‍यता आहे.

दरम्‍यान गेल्‍यावर्षी नोव्‍हेंबरमध्ये पोलिस आयुक्तालयातील तीन उपायुक्‍तांची बदली झाली होती. यानंतर नव्‍याने तिघा अधिकाऱ्यांची रिक्‍त जागांवर नियुक्‍ती करण्यात आलेली होती. परंतु दीर्घ कालावधीपासून बदलीच्‍या प्रतीक्षेत असलेल्‍या श्रीमती चौघुले यांची बदली करण्यात आलेली नव्‍हती.

मंगळवारी त्‍यांच्‍या बदलीचे आदेश जारी केले आहेत. दरम्‍यान त्‍यांनी गुन्हे, विशेष शाखा तसेच वाहतूक विभागात जबाबदारी सांभाळली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : धंगेकर हट्टाला पेटले पण पोलिस म्हणतात, पुरावे नाहीत; पुण्यात नेमकं चाललंय काय?

Loksabha election : निवडणूक किस्सा! अमिताभ बच्चन उमेदवार अन् लिपस्टिकच्या खुणा असलेल्या चार हजार मतपत्रिका...

IPL 2024 RCB vs DC Live Score : दिल्लीची अवस्था खराब; आरसीबीने 4 षटकात केले 4 फलंदाज बाद

Ravindra Dhangekar : भाजपकडून पुण्यात पैसे वाटल्याचा आरोप, काँग्रेस उमेदवार धंगेकरांचं पोलिस ठाण्यात धरणे आंदोलन

राजकारणात तुम्हाला 'संतान' होत नाही तर माझा काय दोष; उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींना असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT