house buying esakal
नाशिक

Diwali Padwa 2023: पाडव्याचा मुहूर्तावर शेकडो प्रकल्पांचे हस्तांतरण! शहराच्या बाह्य भागाला पसंती

सकाळ वृत्तसेवा

Diwali Padwa 2023 : साडेतीन मुहूर्तापैकी एक पाडव्याचा मुहूर्त साधत स्वप्नातील घर ताब्यात घेण्याचा आनंद साजरा झाला. शहरात दिपावलीच्या कालावधीमध्ये शेकडो प्रकल्पांचे हस्तांतरण ग्राहकांना झाले.

शहरात घरांचे वाढते दर लक्षात घेता व भविष्यात चांगला फायदा लक्षात घेऊन शहराच्या बाह्य भागात घरे घेण्याकडे पसंती मिळतं असल्याने शहर विस्ताराला चालना मिळणार आहे. (Transfer of hundreds of projects on occasion of Diwali Padwa 2023 Prefer outskirts of city nashik)

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जवळपास पाच हजारांहून अधिक फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध होते. दसरा व दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी यापुर्वीच टोकन देवून बुकिंग झाले होते. बुकींग झालेल्या घरांचे पाडव्याला हस्तांतरण झाले.

मखमलाबाद, आनंदवली, पाथर्डी, गंगापूर तसेच आडगाव भागातील प्रकल्पांना मागणी होती. चुंचाळे व अंबड शिवारात बजेट फ्लॅट हातोहात विकले गेले.

यंदा फार्म हाऊसला देखील मागणी वाढल्याचे दिसून आले. बंगलो प्लॉटचे दर ३० ते ६० हजार रुपये वार राहिले. गंगापूर, आनंदवली भागात ६५ ते ८५ हजार रुपये वार प्लॉटचा होता. नाशिक शिवारात तपोवन, टाकळी या भागात नवीन प्रकल्पांना चालना मिळाली.

नांदूर, मानूर तसेच आडगाव शिवारात बंगलो, रो-हाऊसची मागणी नोंदविण्यात आली. वडाळा शिवारात डीजीपी नगर भागात प्लॉटला अधिक भाव मिळाला. गेटेड कम्युनिटी प्रकल्पांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव अधिक मागणी दिसून आली.

सिन्नर फाटा भाग भविष्यात ट्रान्सपोर्ट जंक्शन होणार असल्याने त्या भागात नवीन प्रकल्पांचे उद्घाटन झाले. नाशिकरोड भागात डबलडेकर पुलामुळे घरांना मागणी वाढली.

कमर्शिअल प्रॉपर्टीला पुणे महामार्गाच्या बाजूने चांगली किंमत मिळतं आहे. टाकळी ते जेलरोड हा नव्याने विकसित असलेल्या भागात नवीन निवासी प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.

"नाशिक राज्यात वेगाने वाढणारे शहर आहे. त्यामुळे आतापासूनच घरे घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. यंदाच्या दिवाळी सणाला मोठ्या प्रमाणात बुकिंग झाल्याने पुढील दोन ते तीन वर्ष हाच ट्रेंड कायम राहील."- कृणाल पाटील, अध्यक्ष, क्रेडाई मेट्रो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : ..मग महाराष्ट्रात भाषे वरून भांडणे का लावली जात आहेत? - संजय राऊतांचा सवाल!

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT