Transfer of dutiful police officer nandkumar gayakwad
Transfer of dutiful police officer nandkumar gayakwad  esakal
नाशिक

कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याची बदली; अवघा गाव झाला भावूक!

रोशन खैरनार

सटाणा (जि. नाशिक) : एखाद्या पोलिस अधिकाऱ्याची बदली (police transfer) झाल्यानंतर सर्वसामान्य जनता आणि अधिकाऱ्यांनी मिळून अशाप्रकारे जाहीर निरोप देण्याचा कार्यक्रम बागलाण तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला. देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांचा आदर्श घेऊन गेली दोन वर्षे नंदकुमार गायकवाड यांनी सटाणा येथे पोलिस निरीक्षक म्हणून कार्यभार पाहताना सर्वसामान्यांशी संपर्क वाढवताना तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. येथील दबंग, कर्तव्यदक्ष, नि:स्वार्थी आणि संवेदनशील पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांची दहशतवादविरोधी विभागात पोलिस निरीक्षकपदी बढतीवर पुणे येथे बदली झाल्याबद्दल त्यांना वाजतगाजत सजविलेल्या जीपवरून शहरातून मिरवणूक काढून निरोप देण्यात आला. या वेळी सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिक भावनाविवश झाले होते.

कोरोनाकाळात केले विशेष काम

कोरोनाकाळात (Corona) जनजागृतीसाठी युवकांच्या मदतीने कोरोना वॉरियर्सची विशेष पथके तयार केली. लसीकरणासाठी दुर्गम भागातील आदिवासी बांधवांची जनजागृतीही केली. आदिवासी कुटुंबीयांना स्वखर्चातून संसारोपयोगी साहित्य, किराणा, धान्य आदी जीवनावश्यक वस्तू देऊन वेळोवेळी माणुसकीचे दर्शन घडविले. ‘पोलिस हाच जनतेचा खरा मित्र’ ही संकल्पना राबविल्याने नागरिकांबरोबरच सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्‍यांमध्ये ते लोकप्रिय ठरले होते.

जनतेकडून पोलिसांबद्दल वाढलेले प्रेम प्रामाणिक सेवेचे प्रतीक

फुलांनी सजविलेल्या जीपवर श्री. गायकवाड यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. चौकाचौकांत महिलांकडून औक्षण, तर नागरिकांकडून सत्कार होत होता. मिरवणुकीच्या शेवटी देवमामलेदार मंदिरात देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांच्या अध्यक्षतेखाली श्री. गायकवाड यांना निरोप देण्यात आला.

''सेवाकाळात काम करताना कोणत्याही राजकीय पुढाऱ्‍याचा दबाव नव्हता. त्यामुळे प्रामाणिक सेवा करून जनतेला न्याय देता आला. जनतेकडून पोलिसांबद्दल वाढलेले प्रेम हे आम्ही केलेल्या प्रामाणिक सेवेचे प्रतीक आहे. सटाणा येथून आपली बदली करण्यात आली नसून कुटुंबासाठी आपण ती मागून घेतली आहे.'' - नंदकुमार गायकवाड, पोलिस निरीक्षक

सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे, किरण पाटील, वर्षा जाधव, श्रीकृष्ण पारधी, पोलिस उपनिरीक्षक राहुल गवई, पोलिस कर्मचारी योगेश गुंजाळ, अशोक चौरे, अनुप्रीती गुंजाळ, जिभाऊ पवार, अजय महाजन, बाजार समितीचे सचिव आबासाहेब तांबे, अरविंद सोनवणे, पंकज सोनवणे, बाळासाहेब भांगडिया, अनिल ततार, राजेंद्र देवरे, देवस्थानचे उपाध्यक्ष रमेश सोनवणे, सुनील खैरणार, राजेंद्र भांगडिया, प्रवीण पाठक, अजय सोनवणे, विकी गुळेचा, स्वप्नील बागड, अब्दुल बोहरी, मंगेश भामरे आदींसह नागरिक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोनानंतर आणखी एका गूढ आजाराने डोकेदुखी वाढली! ही लक्षणे दिसली तर ४८ तासात रुग्णाचा मृत्यू निश्चित

IND vs AFG T20 WC Super-8 : कधीपासून रंगणार सुपर-8चा थरार? भारताचा पहिला सामना कोणाशी; जाणून घ्या Details

Nagpur Accident: नागपुरात आणखी एक कार अपघात! अल्पवयीन कार चालकाने पाच जणांना उडवलं, अल्पवयीन कारचालकासह...

Shubman Gill : दोस्त दोस्त ना रहा... गिलने कर्णधार रोहितला केलं अनफॉलो, मोठं कारण आलं समोर

Latest Marathi News Live Update : सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर अपघात, 4 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT