Manmad Railway Station esakal
नाशिक

Nashik News: भुसावळ विभागातील पंधरा रेल्वेस्थानकांचा कायापालट! PM मोदींच्या हस्ते रविवारी ऑनलाइन उद्‍घाटन

अमोल खरे

Nashik News : भुसावळ विभागातील महत्त्वाच्या पंधरा रेल्वेस्थानकांचा ‘अमृत भारत स्थानक योजने’त समावेश झाल्याने या स्थानकावर अत्याधुनिक सुविधा पुरवली जाणार आहे.

या कामाच्या प्रारंभाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मनमाड, चाळीसगाव, शेगाव, बडनेरा, मलकापूर, नेपानगर या सहा रेल्वेस्थानकांवर रविवारी (ता. ६) ऑनलाइन उद्‍घाटन होणार आहे. (Transformation of fifteen railway stations in Bhusawal section Online inauguration by PM Modi on Sunday Nashik News)

रेल्वेस्थानकांचा विकास करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने ‘अमृत भारत स्थानक योजना’ राबवली जात आहे. या योजनेंतर्गत देशभरातील एक हजार ३०९ रेल्वेस्थानकांचा समावेश करण्यात आल्याने लवकरच त्यांचा कायापालट होणार आहे.

या योजनेंतर्गत विविध अद्ययावत सोयी-सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

भुसावळ विभागातील नाशिक जिल्ह्यातील मनमाड, देवलाली, नांदगाव, लासलगाव यांसह बडनेरा, मूर्तिजापूर, शेगाव, नांदुरा, मलकापूर, पाचोरा, चाळीसगाव, धुळे, नेपानगर, रावेर, सावदा या पंधरा रेल्वेस्थानकांचा यात समावेश करण्यात आला आहे.

मनमाड रेल्वेस्थानकाचाही या रेल्वेस्थानकांमध्ये समावेश असल्यामुळे या रेल्वेस्थानकांचा पाच ते दहा कोटी रुपये खर्च करून मोठ्या प्रमाणात विकास केला जाणार आहे.

या विकासकामांमध्ये रूफ प्लाझा रुंद प्रवेश बाह्यदर्शनी भागाचा विकास, एक्झिक्युटिव्ह लॉज, स्टेशन अप्रोचेस, सर्क्युलेटिंग एरिया, लँडस्केपिंग, मॉडेल टॉयलेट, प्लॅटफॉर्म सरफेस, केबल ट्रेज, अत्याधुनिक फर्निचर, भरपूर प्रकाश योजनेसाठी एलईडी, नावाचे बोर्ड, पार्किंग व्यवस्था, प्रतीक्षागृह, स्वच्छतागृह आदींचा समावेश असणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यामुळे रेल्वेस्थानकांचा विकास होणार आहे. प्रवाशांच्या दृष्टीने ही समाधानकारक बाब असली तरी रेल्वेने प्रवासी सुविधा केंद्रित विकासकामांना अधिक प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

सूचना पाठविण्याचे आवाहन

प्रवाशांसह संबंधित सर्व विविध घटकांकडून विविध स्थानकांवर अमृत भारत योजनेंतर्गत कोणत्या सुविधा व विकासकामे आवश्यक आहेत. त्यासाठी सूचना मागविण्यात आल्या आहेत.

त्याकरिता ट्विटर हँडल (@BhusavalDivn with hashtag #AmritBharat_ station name आणि ई-मेलद्वारे( bsldrm@gmail.com,cprooffice0@gmail.com) प्रवाशांनी व संबंधित घटकांनी सूचना कराव्यात, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT