Continued transportation of iron bars without any measures esakal
नाशिक

Nashik News: लोखंड, स्टीलची वाहतूक उठली जिवावर; नियम पायदळी तुडवत, उपाययोजना न करता अवैद्य वाहतूक!

सकाळ वृत्तसेवा

विकास बाविस्कर : सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : अंबड औद्योगिक वसाहतीत दैनंदिन कामकाजात मोठ्या प्रमाणावर स्टील, लोखंडी सळ्यांची वाहतूक खासगी वाहनांमधून करण्यात येत असते. परंतु, ही वाहतूक करत असताना नियम पायदळी तुडवत प्रशासनाच्या नाकावर टिच्चून ही वाहतूक होत आहे.

असे असतानाही वाहतूक पोलिस या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. (Transport of iron and steel vital Trampling rules without taking measures illegal transport Nashik News)

अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत अनेक लहान मोठ्या कंपन्या असून, मोठ्या प्रमाणावर लोखंडी स्टील लागत असल्याने याची आवकही मोठी आहे. यामुळे कंपनी प्रशासन वेळोवेळी स्टील मागवीत असताना या स्टीलची वाहतूक लहान- मोठ्या वाहनांमध्ये केली जाते.

अनेक वेळा या स्टीलची अनधिकृतपणे वाहतूक केली जात असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. वाहतूक होत असताना लोखंडी सळया सर्रास गाडीच्या मागच्या बाजूने बाहेर आलेल्या असतात. या सळ्या बाहेर आल्यानंतर यांना कोणत्याही प्रकारे धोकादायक असल्याचे, इतर वाहनधारकांना समजेल असे कोणतेही सुरक्षा चिन्ह वापरले जात नाही.

यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. खरेतर वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचा परवानाच रद्द व्हायला हवा अशी मागणी होऊ लागली आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी अशा अनधिकृत स्टीलची वाहतूक करणाऱ्या एका वाहनामुळे एका पशुवैद्यकीय तरुणास जीव गमवावा लागला.

ही घटना ताजी असताना वाहतूक पोलिस प्रशासनाने आतापर्यंत किती अनधिकृत वाहतूक करणाऱ्या वाहनधारक व वाहनांवर कार्यवाही केली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत तपासणी सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

फक्त हेल्मेट तपासणी नको...

शहरात दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केले नसल्याच्या अनेक कार्यवाही वाहतूक पोलिसांतर्फे होत असताना, मोठ्या प्रमाणावर होणारी स्टीलची वाहतूक हादेखील गंभीर प्रश्न आहे. फक्त हेल्मेट तपासणी नको, तर अशा अनधिकृत वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवरदेखील कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

"त्या वाहनावर अनधिकृत वाहतूक केलेले लोखंडे अँगल नसते तर कदाचित अपघात होऊनही पशुवैद्यक दीपक आहेर यांचा जीव वाचला असता. असा भीषण प्रसंग घडल्यानंतर अनधिकृत वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर कठोर कार्यवाही होणे अपेक्षित आहे."

- अमित येवला, सामाजिक कार्यकर्ते

"अंबड औद्योगिक वसाहती मोठ्या प्रमाणावर अनेक वाहनधारक अवैद्य वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. वाहतूक पोलिस प्रशासनास आमची विनंती आहे की, अशा वाहनधारकांवर कठोर कार्यवाही झाल्यास अनेकांचे जीव वाचू शकतील व अपघात टळू शकतील." - आबा पाटील, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H5N5 Virus: 'बर्ड फ्लू'च्या दुर्मिळ विषाणूचा धोका वाढला, 'इथे' झाला पहिला मृत्यू; आरोग्य विभागाकडून निवेदन

Agriculture News : द्राक्षपंढरीची व्यथा! 80% उत्पादन घट, आता निर्यातक्षम द्राक्ष तपासणीच्या 10 हजार खर्चाचा बोजा शेतकऱ्यांच्या मानगुटीवर

Latest Marathi News Live Update : पेण नगरपालिकेच्या वतीने मतदारांसाठी जनजागृती रॅली

आमदारांना ओळखलं नाही अन् उभा न राहिल्यानं डॉक्टरना, नोटीस बजावणं असंवेदनशील; हायकोर्टानं सरकारला फटकारलं

IND vs SA, 2nd Test: दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत, भारताच्या कुलदीप यादवला ३ विकेट्स; पहिल्या दिवशी काय घडलं?

SCROLL FOR NEXT