नाशिक

बॅगेत काय घ्यावे अन् कशी भरावी?

CD
लेख क्र. २ ---------- फोटो - NSK26H33736 उल्का मानकर पर्यटनाला जायचंय? ---------------- बॅगेत काय घ्यावे अन् कशी भरावी? लांब कुठे प्रवासाला, पर्यटनाला जायचे म्हटले की, अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांचाच उत्साह ओसंडून वाहत असतो. काय काय घेऊन जायचे, याचा विचार सुरू होतो आणि हे लागेल, ते लागेल म्हणून खूप सामान काढले जाते. जेव्हा खरी पर्यटनाला सुरवात होते तेव्हा लक्षात येत की, अरेच्या..! हे तर मी घेतलेच नाही. म्हणून आपली बॅग कशी भरावी आणि काय बरोबर असावे त्यासाठी हा लेखन प्रपंच... - उल्का मानकर, नाशिक पर्यटनातली/प्रवासातली गंमतीदार, मजेशीर गंमत आठवली. आमच्या बरोबरच्या एका सहप्रवासीणीने चार चप्पलांचे जोड बरोबर घेतले होते. बिचाऱ्या नवऱ्याला बॅग उचलणे, सांभाळणे कठीण झाले होते. जेव्हा आम्ही सर्वजण स्वीमिंग पुलमध्ये उतरणार होतो तेव्हा ती महिला माझ्याकडे स्वीमिंग कॉस्च्युम नाहीये म्हणून हिरमुसून बसली. त्यासाठी प्रवासात काय आवश्यक आहे याचे व्यवस्थित नियोजन करणे फार गरजेचे असते. तुम्ही कुठे जात आहात, देशाबाहेर की देशातंर्गत? किती दिवसांसाठी, कोणत्या सीझनमध्ये, यावर किती कपडे, कुठल्या पद्धतीचे हवेत हे अवलंबून असते. बॅगेचे आकारमान फार महत्त्वाचे असते. ट्रॉली असलेली, सॉफ्ट लगेज, बाहेरच्या बाजूला कप्पे असलेली आटोपशीर बॅग असावी. सर्वात महत्त्वाचे रोजची औषधे. शक्यतो स्ट्रिप्स एकेक गोळ्या अशा कापून छोट्याशा झिपलॉकच्या पिशवीत ठेवाव्यात. अशाच अजून एका पिशवीत छोटीशी कात्री, सुईदोरा, नेलकटर, बॅनडेड, पेनकिलर गोळ्या, छोटासा पेनकिलर स्प्रे असे ठेवावे. बॅगेत भरण्याच्या अत्यावश्यक गोष्टी मोबाईल आवश्यक घटक असल्याने सोबत चार्जर, हेडफोन्स तसेच पॉवरबँक न विसरता बॅगेत ठेवावी. जर भारताबाहेर जात असाल तर, वेगळा प्लग होल्डर हवा. गरज असल्यास एखादी छोटी टॉर्च जवळ असावी. स्कार्फ, गॉगल, उन्हाची/थंडीची टोपी, टॉवेल/पंचा, रोजच्या वापरातले शूज आणि चप्पल, २-३ पायमोजे, नॅपकिन, हातरुमाल सोबत ठेवावे. आजकाल बऱ्याचजणी जीन्स, ट्राउझर वापरत असल्याने ३-४ टॉप्स बाळगावे. एखादा पार्टीवेअर ड्रेस ठेवावा. समजा क्रूझवर जाणार असाल तर, शेवटच्या दिवशी हमखास असा ड्रेस लागतोच. टूथपेस्ट, टूथब्रश, फेसपावडर पॅक, काजळ वापरत असाल तर काजळ पेन्सिल, छोटासा आरसा, कंगवा, रबरबँडस, सेफ्टीपिन्स आणि एक तरी नाडी बरोबर असावी. या सर्व वस्तू एकाच पाऊचमध्ये असाव्यात. भारंभार मेकअपच्या सामानाचे ओझे वागवू नये. तसेच खूप मॅचिंग बांगड्या, कानातली बरोबर घेऊ नयेत. आपण नैसर्गिक सौंदर्य, वास्तू-स्थापत्य, तिथली संस्कृती वगैरे बघायला जात असतो. अशावेळी वेट टिश्यूचे पॅकेट नक्कीच बरोबर हवे. आपल्याकडे स्वच्छ प्रसाधनगृहांची वाणवा असते. खासकरून महिलांसमोरची मोठी अडचण असते. अशावेळी जर कमोड टॉयलेट वापरायचे असेल तर वेट टिश्यूने सीट पुसून वापरता येते. इन्फेक्शन होऊ नये यासाठी डॉक्टरच्या सल्ल्याने क्रीम्स सोबत ठेवावी. काही जुन्या प्लॅस्टिकच्या पिशव्या कचरा, घाण फेकण्यासाठी जवळ असाव्यात. भारतात फिरताना खाण्याचे पदार्थ फारसे सोबत घेऊ नयेत. अगदी सकाळी गोळ्या घेताना वगैरे तोंडात टाकता येतील असे पदार्थ असावेत. बाहेरच्या देशात मात्र शाकाहारी प्रवाशांनी कोरडे खाण्याचे पदार्थ बरोबर ठेवावेत. मल्टिपल बॅगची आवश्यकता एक मल्टिपल कप्प्यांची स्लिंग बॅग/पर्स सोबत असावी. बायकांच्या पर्समध्ये बऱ्याच गोष्टी असतात आणि एखादी काढताना दुसरी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी पैसे ठेवण्यासाठी कापडाच्या अगदी छोट्या नाडीच्या पिशव्या शिवून घेता येतात. पर्समध्ये ठेवताना पर्सच्या कप्प्याला सेफ्टी पीन लावून ठेवता येते. त्यामुळे कुठलीही गोष्ट काढताना तुमचे पैसे कधीही पडत नाहीत. बरोबर ओळख पत्र, तिकीट किंवा इतर तत्सम कागदपत्रे ही एका कप्प्यात व्यवस्थित ठेवावी. गरज नसलेल्या जोखमीच्या वस्तू बरोबर नसतील तर, तुम्ही टेन्शन फ्री फिरू शकता आणि पर्यटनाचा मनमुराद आनंद घेऊ शकता. अशा पद्धतीने आपण जर वस्तू, कपडे यांचे व्यवस्थित नियोजन केले आणि बॅगेतही व्यवस्थित ठेवले तर नक्कीच प्रवास/पर्यटन अगदी व्यवस्थित पार पडेल. (लेखिकेने ५५ देशांचे बॅकपॅकिंग व संपूर्ण भारताची सफर केलेली आहे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC election results: चार राज्यांतील 28 जागांपैकी काँग्रेसच्या वाट्याला एकही नाही; सत्ता असूनही कर्नाटकात काँग्रेसची धूळधाण

Pune News : शिक्षकांच्या प्रश्नांसाठी प्राधान्याने काम करणार, टीकेला कामातून उत्तर देणार; कौस्तुभ गावडे यांची ग्वाही

अमरावती शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर! किरण सरनाईक सलग दुसऱ्यांदा विजयी, काँग्रेसच्या अदिती पोहरेंचा पराभव

Marathi News Live Updates : अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किरण सरनाईक विजयी; काँग्रेसच्या अदिती पोहरे यांचा पराभव!

Spain Train Accident: स्पेनमध्ये भीषण अपघात; २ हाय-स्पीड रेल्वेगाड्यांची धडक; ३० जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT