नाशिक

नगरपंचायत क्षेत्रासाठी वृक्ष प्राधिकरणाची स्थापना

CD
नगरपंचायत क्षेत्रासाठी वृक्ष प्राधिकरणाची स्थापना नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत मान्यता सकाळ वृत्तसेवा शिंदखेडा, ता. ६ : शिंदखेडा नगरपंचायत क्षेत्रातील वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करणे, पर्यावरणाचा समतोल राखणे तसेच शहरातील हरित क्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने शिंदखेडा नगरपंचायत क्षेत्रासाठी वृक्ष प्राधिकरण स्थापन करण्यास नगरपंचायतीच्या ५ नोव्हेंबरला झालेल्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. वृक्ष प्राधिकरणाच्या पदसिद्ध अध्यक्षपदी शिंदखेडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहतील. तसेच, प्राधिकरण सदस्य म्हणून नगरपंचायत सदस्यांमधून सदस्यांची निवड करण्यात आली आहे. नगरपंचायतीच्या सदस्यपदी सुयोग भदाणे, दीपक माळी, सुनीता देसले, शितल सोनवणे याशिवाय वृक्षसंवर्धन व पर्यावरणविषयक कामकाजात योगदान देण्यासाठी दोन अशासकीय सदस्यांचीही निवड करण्यात आली. वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरातील वृक्षांची गणना व नोंदणी, वृक्षांचे संरक्षण व संवर्धन, वृक्षारोपण, वृक्षांचे पुनर्रोपण, वृक्षतोडीच्या परवानगीसंबंधी कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच, नागरिक, स्वयंसेवी संस्था, शाळा व महाविद्यालयांच्या सहभागातून वृक्षसंवर्धन व पर्यावरणविषयक जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शहराचा शाश्वत विकास साधताना पर्यावरणाचे संतुलन राखणे आणि भावी पिढ्यांसाठी हरित शिंदखेडा निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी सर्व नागरिकांनी नगरपंचायतीच्या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगरपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे. सर्वसाधारण सभेस नगराध्यक्षा कलावती माळी, उपनगराध्यक्ष उदय देसले, मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, सर्व सन्माननीय नगरसेवक व नगरसेविका, प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ, पाणीपुरवठा अभियंता विपुल साळुंखे, वरिष्ठ लिपिक विवेक डांगरीकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ACB Action: मोफत कायदेशीर मदतीच्या नावाखाली लाचखोरी! वकील ताब्यात, पत्नीविरोधातही गुन्हा; एसीबीने रंगेहाथ पकडलं

Maharashtra Village Diwali Bonus: महाराष्ट्रातील 'या' गावाची कमाल! गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस; विकासाच्या जोरावर देशभर डंका

Lavrov Deepfake: बनावट व्हिडिओमुळे प्रशांत भूषण अडचणीत; दिल्ली पोलिसांनी दाखल केली FIR

ना हिरो, ना खलनायक; महेश कोठारेंच्या 'माझा छकुला' मध्ये हमाल म्हणून दिसलेले सचिन गोस्वामी; कशी मिळालेली भूमिका? म्हणाले-

Pune Crime: पुण्यात व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळ्यांचे सोने लुटले; उत्तर प्रदेशातील टोळीला मकोका

SCROLL FOR NEXT