Tree Cutting esakal
नाशिक

झाडांच्या सदोष छाटणीने नागरिकांचे बळी

यंदाच्या पहिल्याच पावसात जमिनीची माती भुसभुशीत होऊन झाड उन्मळून बळी जाण्याचे प्रकार पुढे आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : झाड उन्मळून पडल्याने शहर जिल्ह्यात बळी जातात. यंदाच्या पहिल्याच पावसात जमिनीची माती भुसभुशीत होऊन झाड उन्मळून बळी जाण्याचे प्रकार पुढे आले आहे. त्यामुळे पावसाळी झाडांची सदोष छाटणीच मुद्दा ऐरणीवर आला आहे. वृक्षारोपण मोहिमेत पारंपरिक प्रजातींची झाडांऐवजी पावसाळी विदेशी प्रजातींच्या झाडांना मोठे प्राधान्य दिले जात आहे. पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून झाडांच्या फांद्या तोडताना ठराविक एका म्हणजे साधारण विजेच्या तारा असलेल्या भागाकडील फांद्या तोडल्या जातात. परिणामी, दुसऱ्या बाजूकडील फांद्या आणि झाड कमकुवत होऊन एका बाजूला झुकते. त्यातून पावसाच्या पहिल्या पाण्यात माती भुसभुशीत होऊन झाडे कोसळतात.

कोरडी माती झाडाला धरुन ठेवते, तर पावसाळ्यात पाण्याने जमीन भुसभुशीत होऊन झाडांची मूळ कमकुवत होतात. त्यामुळे दरवेळी पावसाळा आला म्हणजे झाड उन्मळून पडण्याच्या घटना वाढतात. त्यात सगळ्याच प्रकारची झाड उन्मळून पडत असली तरी, पावसाळी विदेशी प्रजातींच्या झाडांची संख्या तुलनेने अधिक असल्याचे पर्यावरणप्रेमींचे निरीक्षण आहे. नाशिक शहरात सुबाभूळ, गुलमोहर, रेन ट्री, स्पॅतेडिया, आकेशिया, पेल्टा फोरम या आणि अशा पारंपरिक झाडांच्या तुलनेत कमकुवत प्रजातींची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. अनेक वर्षे सातत्याने लागवड झालेल्या या मोहिमेचे दुष्परिणाम दिसू लागले आहे.

तक्रार आली तरच धोकादायक...

धोकादायक झाड कशाला म्हणायचे, हा सध्या कळीचा मुद्दा आहे. पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून झाडांच्या फांद्या कापण्याचा नियम आहे. मात्र ज्या वीजतारांना फांदी घासतात, अशा झाडांना धोकादायक वर्गवारीत घेऊन त्यांच्या फांद्या तोडल्या जातात. भले मग विजेच्या तारा जात नसलेल्या भागातील झाड अगदी एका बाजूला वाकून उन्मळून स्थितीत असले तरी ते महावितरण कंपनी तोडत नाही. कारण त्यांच्या ठेकेदारांना फक्त विजेच्या तारांना घासणाऱ्या फांद्या तोडण्याचे काम असते. तर, महापालिकेकडून मात्र गटारी स्वच्छता पलीकडे धोकादायक वृक्षांच्या फांद्या तोडल्या जात नाही.

जेव्हा कधी नागरिक तक्रार करतील. तेव्हा महापालिका यंत्रणा झाड किंवा फांद्या तोडण्याचा विचार करते. तक्रार येत नाही तोपर्यंत महापालिकेच्या लेखी कोणतेही झाड धोकादायक नाही, अशीच बहुधा त्या विभागाची धारणा आहे.

या त्रुटी

- खोदकाम करताना मुळ तुटतात

- झुकलेल्या झाडांवर लक्ष नाही

- पावसाळी झाडांची सदोष छाटणी

- विजेच्या ताराखालील झाड दुर्लक्षित

''झाडांच्या फांद्या तोडताना एका बाजूच्या झाडांची कत्तल होते. केवळ विजेच्या तारांना अडथळा ठरतात, अशाच झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून वाकलेले, झुकलेले, मूळ बाहेर आलेले अशा धोकादायक वृक्षांची पाहणी केली पाहिजे.'' - शेखर गायकवाड, आपलं पर्यावरण संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT