Commissioner Chitra Kulkarni during review at Tehsildar office. Neighbor Tehsildar Abhijit Barwakar. esakal
नाशिक

Nashik News: लोकसेवा हक्क आयोगाच्या आयुक्तांकडून झाडाझडती; इगतपुरीत विविध कार्यालयांना भेटी देऊन तपासणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागीय आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी इगतपुरी तालुक्यात भेट दिली. त्यांनी इगतपुरी तहसीलदार कार्यालय, पुरवठा शाखेची कार्यालयीन तपासणी केली.

सर्व तालुकाप्रमुखांकडून बैठकीत आढावा घेतला. विभागनिहाय अधिकाऱ्यांना प्रलंबित अर्जांबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. (Tree felling by Commissioner of Public Service Rights Commission Inspection by visiting various offices in Igatpuri Nashik News)

सेवा हक्क कायद्यांतर्गत येणाऱ्या अर्जांवर मुदतीत कार्यवाही न केल्यास अधिकाऱ्यांवर दंडात्मक रवाई केली जाईल, अशा सूचनाही त्यांनी केली. तहसील कार्यालयासमोरील आपले सरकार सेवा केंद्राची तपासणी केली व त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.

इगतपुरी नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवा हक्क कायद्याकडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. नागरिकांना सेवा मुदतीत देण्याची ताकीद आयुक्त कुलकर्णी यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिली.

लोकसेवा हक्क कायदे अंतर्गत येणाऱ्या सेवा विहित मुदतीत नागरिकांना न मिळाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील दाखल करावे, असे आवाहन आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी या वेळी केले. कार्यालयीन तपासणी दौऱ्यात आयोगाच्या कार्यालयातील सुनील जोशी, उपसचिव सचिन पोतदार, सहाय्यक कक्ष अधिकारी घोडके आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफी; आता रकमेची मर्यादा नव्हे सातबाराच होणार कोरा! राज्यातील २४.७३ लाख शेतकऱ्यांकडे ३५,४७७ कोटींची थकबाकी

सोलापूर शहर पोलिसांची कारवाई! स्वयंघोषित ‘दादा’ 8 दिवसांसाठी होणार तडीपार; महापालिका निवडणुकीपूर्वी ‘या’ गुन्हेगारांची पोलिस ठाण्यांकडून मागविली माहिती

Morning Breakfast Recipe: कुठल्याही पूर्वतयारीशिवाय १५ मिनिटांत सकाळी नाश्त्यात बनवा पेरी पेरी कबाब, सोपी आहे रेसिपी

अग्रलेख - शेजारचा आजार

Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT