palas.jpg 
नाशिक

बहुगुणी पळस बहरला ; वसंत ऋतूत निसर्गाचा रंगोत्सव...

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (तळवाडे दिगर) "फ्लेम ऑफ द फायर' असे खुद्द इंग्रजांनी ज्याचे वर्णन केले आहे तो पळस सध्या चोहीकडे मोठ्या प्रमाणात बहरला आहे. लाल केशरी आणि किंचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहरलेली पळसाची झाडे सध्या सर्वच ठिकाणी वाटसरूंचे लक्ष वेधून घेत आहेत. 

"पळसाला पाने तीन' अशी म्हण प्रचलित

शिशिराची थंडी ओसरायला लागली, पानगळीने उघडी पडलेली वृक्षराजी नव्या पालवीचे लेणे अंगावर मिरवायला लागली की वसंताची चाहूल लागते. या वसंतात फक्त रंगांची उधळण, रंगोत्सव सुरू होतो निसर्गाचा. शिशिरात बोडक्‍या झालेल्या शेताला केशरी लाल रंगात न्हाऊ घालणारा पळस नटलेला चोहीकडे पाहण्यास मिळत आहे. झाडाच्या प्रत्यके फांदीवर लगडलेली फुले विस्तवाच्या गोळ्यांसारखी दिसत आहेत. 20 ते 25 फूट उंच असणाऱ्या पळसाला संस्कृतमध्ये पलाश म्हणतात. याचा अर्थ फुलांनी डवरलेले झाड असा होतो. पळसाची फुले श्री सरस्वती आणि कालीमाता या दोन्ही देवींच्या पूजेसाठी भक्तिभावाने वापरली जातात. कुठेही गेले तरी "पळसाला पाने तीन' अशी म्हण प्रचलित आहे. पळसाची पानेही फार उपयोगी आहेत. 

पाने गळून गेल्यानंतर पळसाला फुलांचे धुमारे

पूर्वी या पानांपासून मोठ्या पंगतीला जेवण देण्यासाठी द्रोण आणि पत्रावळ्या बनविल्या जात. आता काळ बदलला तरी त्याचे महत्त्व कमी झालेले नाही. पळस हा डोंगराळ भागात किंवा शेताच्या बांधावर दिसणारा वृक्ष. त्याची उंची जास्त नसते आणि तो पानगळी वृक्ष आहे, खोड आणि फांद्या वेड्यावाकड्या असतात; तर साल खडबडीत राखाडी रंगाची असते. पाने आकाराने मोठी असतात म्हणूनच त्याचा द्रोण, पत्रावळी बनविण्यासाठी वापर करतात. सर्व पाने गळून गेल्यानंतर पळसाला फुलांचे धुमारे फुटतात. सध्या पळसाची झाडे लाल केशरी, भगवा आणि पिवळ्या अशा रंगांच्या फुलांनी लगडलेली दिसत आहेत. 

धूलिवंदनाला रंग बनविण्यासाठी पळसाच्या फुलांचा वापर

पूर्वी धूलिवंदनाला एकमेकांच्या अंगावर टाकण्यासाठी उपयोगात येणारा रंग बनविण्यासाठी पळसाच्या फुलांचा वापर केला जात असे. आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणूनही याचा वापर होत असे. पळसाची फुले पाण्यात टाकून स्नान केले तर त्वचारोग नाहीसा होतो, असेही आयुर्वेदात म्हटले आहे. पळसाच्या बियांचाही औषधीसाठी वापर केला जातो. अशा बहुगुणी आणि त्यांच्याकडे लक्ष जाताच पाहणाऱ्याच्या डोळ्यांना भुरळ घालणारा पळस सध्या लाल गडद झाला आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ... तर महेंद्रसिंग धोनी CSK संघातील जागा अडवतोय! एबी डिव्हिलियर्स म्हणाला, निवड गुणवत्तेच्या आधारावर झाली पाहिजे

इराणच्या पेट्रोलपेक्षा भारतात चहा महाग! एक लीटर पेट्रोल अन् डिझेलचा दर वाचून बसेल धक्का

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, अनिल बोंडे यांच्याकडून टीका

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास! पण कुठे आणि कसा? परिवहनमंत्र्यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT