नाशिक : ‘ट्रायल रन’चा पंचवटीतही फज्जा
नाशिक : ‘ट्रायल रन’चा पंचवटीतही फज्जा  sakal
नाशिक

नाशिक : ‘ट्रायल रन’चा पंचवटीतही फज्जा

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : स्मार्टसिटी प्रकल्पातंर्गत शहरातील प्रमुख चौकातील वाहतूक बेटाच्या विकास प्रकल्पातंर्गत ट्रायल रनचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, सर्वाधिक वर्दळीच्या पंचवटीतील निमाणी उद्यानाजवळील ट्रायल रनमुळे या भागात सोमवारी (ता.१३) नव्याने वाहतूक वाहतूक कोंडी अनुभवण्यास मिळाली. यामुळे स्थानिकांसह वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला.

खरेतर महापालिकेने ज्या भागात ट्रायल रनचा प्रयोग राबवायचा आहे, तेथील वाहतुकीचे इतरत्र योग्य नियोजन करून हा प्रयोग राबविणे आवश्‍यक आहे. शहरातील वर्दळीच्या रविवार कारंजा, अशोक स्तंभ, पंचवटी कारंजा भागात याअंतर्गत कामे करण्यात येणार असून, त्याची रंगीत तालीम म्‍हणून या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात गोण्या मांडण्यात आल्या आहेत.

निमाणी गार्डन भागात या उपक्रमाची अंमलबजावणी होणार आहे, त्या भागात निमाणी सिटी बस या मुख्य बस थांब्यासह अनेक शाळा, महाविद्यालये तसेच बाजार समितीही आहे. याशिवाय गुजरातकडे जाणारा जवळचा मार्गही येथूनच जातो. त्यामुळे या ठिकाणी चोवीस तास वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा ठिकाणी हा प्रयोग राबविणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया अनेक वाहनधारकांनी नोंदविली आहे.

गोण्यांवरून वाहनांचे मार्गक्रमण

ट्रायल रनसाठी लावलेल्या गोण्या वाहतुकीस अडथळा ठरत असल्याने अनेक दुचाकीस्वार, रिक्षाचालक थेट या गोण्यांवरून गाड्या हाकत होते. त्यामुळे शहराच्या इतर भागासारखाच या ठिकाणीही ट्रायल रनचा फज्जा उडाल्याची चर्चा रंगली. परशराम पुरिया बागेसमोर मोठ्या प्रमाणात बेकरी उत्पादकांची दुकाने व भट्ट्या असून या ठिकाणी अनेकवेळा वाहने लावण्यासाठीही जागा नसते. अशा ठिकाणी खरेतर रुंद रस्ते हवेत, परंतु वाहतूक बेटाच्या नावाखाली रस्त्यांची रुंदी कमी करणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया अनेक वाहनधारकांनी व्यक्त केली.

"पंचवटी कारंजा, भडक दरवाजा हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. या ठिकाणी ट्रायल रनच्या नावाखाली रस्ता अडविणे चुकीचे आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीत भरच पडण्याची शक्यता आहे."

- संजय पोरजे, व्यावसायिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल मारहाणीप्रकरणी दिल्ली पोलीस अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी

IPL 2024 : 'तुम्ही मला अन् धोनीला शेवटच एकत्र खेळताना...' RCB vs CSK सामन्यापूर्वीच विराट कोहलीच्या वक्तव्याने उडाली खळबळ

NASA Mission : पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी NASAची ध्रुवीय प्रदेश मोहिम!

Super-Rich Club: जगातील अतिश्रीमंतांची संख्या वाढली; यादीत गौतम अदानींचे कमबॅक, नंबर एक वर कोण?

Mumbai Loksabha: मुंबईची लढत का आहे इतकी इंट्रेस्टींग? वाचा संपूर्ण आकडेवारी

SCROLL FOR NEXT