नाशिक

शिरपूर : बोराडी धर्मजागरण मेळावा

CD
(पान ४ ला मेन) SHC26B13573, SHC26B13574 बोराडी (ता. शिरपूर) : मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्रताप वसावे. शेजारी योगी दत्तनाथ महाराज व पदाधिकारी. दुसऱ्या छायाचित्रात उपस्थित आदिवासी बांधव. ------------- आदिवासी संस्कृतीच्या रक्षणासाठी संघटित व्हा प्रताप वसावे यांचे आवाहन; बोराडीत भगत, पुजारी, वैद्यांचा मेळावा सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. ४ : जल, जंगल आणि जमिनीशी अतूट नाते जोडलेल्या आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, धार्मिक परंपरा, श्रद्धास्थाने आणि वडिलोपार्जित ज्ञानाचा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी समाजातील भगत, पुजारी, तांत्रिक, मांत्रिक तसेच पारंपरिक वैद्य यांनी संघटित होऊन पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रताप वसावे यांनी केले. बोराडी (ता. शिरपूर) भगवान बिरसा मुंडा भवनात आदिवासी धर्म जागरण समितीतर्फे आदिवासी समाजात धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणार्‍या भगत, पुजारी, तांत्रिक, मांत्रिक व पारंपरिक वैद्यांचा मेळावा नुकताच घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आमलाल महाराज, योगी दत्तनाथ महाराज व वासुदेव महाराज उपस्थित होते. पारंपरिक ज्ञान जतन करा आदिवासी समाजाकडे पिढीजात वनौषधी, आयुर्वेदिक उपचारपद्धतीचे महत्त्वपूर्ण पारंपरिक ज्ञान आहे. त्याचे शास्त्रीय पद्धतीने दस्तऐवजीकरण करून जतन करावे, त्याचा योग्य वापर आणि पुढील पिढीला हस्तांतरण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत असे आवाहन वासुदेव महाराज यांनी केले. व्यसनमुक्ती आणि शिक्षणावर भर समाजातील वाढती व्यसनाधीनता, अंधश्रद्धा आणि धर्मांतरासंदर्भात मेळाव्यात चिंता व्यक्त करण्यात आली. प्रलोभनांना बळी न पडता जागरूक राहावे, आपल्या परंपरा, श्रद्धा व सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत, मुला- मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे, असा सूर मेळाव्यातून निघाला. आदिवासी धर्म जागरण समितीच्या कार्यकर्त्यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: 'एका अब्दुलने मिशीगन जिंकले; आता दुसऱ्याने यूपीत कमाल करून दाखवावी!' ओवैसींना म्हणायचेय काय?

MSRTC strike Diwali: ऐन दिवाळीत 'एसटी'चा संप! कर्मचाऱ्यांनी दिली राज्यव्यापी आंदोलनाची हाक

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा! किनीतील आंदोलनामुळे कोगनोळीत ट्रकच्या लांबच लांब रांगा

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

कोणाकडे तरी आकर्षित होऊन... वयाच्या ६० व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी का केलं दुसरं लग्न? आता सांगितलं कारण, म्हणाले-

SCROLL FOR NEXT