Pranjali Tiranik while drawing sketches of revolutionaries.  esakal
नाशिक

Tribal Day 2023 : बालचित्रकार प्रांजलीकडून कलेतून अस्मितेचा जागर; अप्रतिम चित्रे रेखाटत क्रांतिकारकांना आदरांजली

योगेश मोरे

Tribal Day 2023 : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून प्रांजली परमानंद तिराणिक या बालचित्रकाराने क्रांतिकारकांची अप्रतिम रेखाचित्रे साकारत आदिवासी अस्मितेचा जागर केला आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस घोषित केल्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनन्य साधारण आहे.

ब्रिटिशांविरुद्ध लढताना आदिवासींनी शंभरपेक्षाही अधिक लहान मोठे सशस्त्र संघर्ष केले. या संघर्षामध्ये अनेक आदिवासी वीर हुतात्मा झाले.

१७८५ ला बिहारमध्ये तिलका मांझी हे ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करून फासावर गेले. तेव्हापासून आदिवासींच्या लढ्याचा धगधगता इतिहास सुरू आहे. (tribal day 2023 pranjali tiranik initiative to awaken identity of tribals through pictures nashik news)

१४५० पासून तर स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत निरनिराळ्या प्रदेशातील आदिवासी विरांनी स्वातंत्र्यासाठी उठाव, चळवळी केल्या, ब्रिटिशांशी संघर्ष केले. त्यात भगवान बिरसा मुंडा हे वगळता इतर आदिवासी क्रांतिकारकांची फारशी दखल अजूनही इतिहासात नाही. रॉबीनहुड शामादादा कोलाम, बाबूराव पुलेश्वर शेडमाके, तंट्याभिल्ल, राघोजी भांगरे, नारायणसिंह उईके, राणी दुर्गावती यासारख्या शेकडो क्रांतिकारकांची माहिती अभ्यासामध्ये आलेली नाही.

त्यामुळे या क्रांतिकारकांना रेखाचित्रातून आदरांजली वाहून प्रांजली परमानंद तिराणिक या मुलीने या दिनानिमित्त रेखाचित्रे साकारून चित्रांतून आदिवासींच्या अस्मितेचा जागर करण्याचा आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे. नाशिकमधील दिव्यांग संस्थेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा आनंदवनातील अंध शाळेचे शिक्षक परमानंद तिराणिक यांची ती मुलगी आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

राष्ट्रपतींकडून भेटीचे आमंत्रण

प्रांजली ही इयत्ता दहावीमध्ये लोकमान्य इंग्लिश मीडियम हायस्कूल, वरोरा येथे शिकत आहे. तिने शासनाच्या अनेक चित्रकला स्पर्धांत पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविलेले आहे. ती नृत्य सुद्धा छान करते.

तसेच तिने नुकतेच आता गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यानिमित्त त्यांना त्यांचे रेखाचित्र भेट देणार होते, परंतु शासकीय प्रोटोकालमुळे ते रेखाचित्र तिला भेट देता आले नाही. मात्र ही बाब राष्ट्रपतींना कळली तेव्हा त्यांनीच प्रांजलीला थेट दिल्लीच्या राजभवनात भेटीचे आमंत्रण दिलेले आहे.

"आदिवासींमध्येही अनेक स्वातंत्र्यवीर होऊन गेले. पण पाठ्यक्रम अभ्यासक्रमात याची कोठेही नोंद नसल्यामुळे हे क्रांतिवीर नव्या पिढीला व जनसामान्यांच्या लक्षात यावे, म्हणून मी ही चित्रे काढली आहेत." - प्रांजली तिराणिक, बालचित्रकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT